अजिंक्यतारा चषक मल्लखांब स्पर्धा आता बोरीवली पूर्वेत
मुंबई— सुविद्या डिग्री कॉलेजच्या योजनेतर्फे आणि मल्लखांब
लव संघाच्या संयुक्त विद्यमाने येत्या ३ व ४ मे २०२५ रोजी संध्याकाळी ४ ते
रातेपर्यंत बोरीवली पूर्वेतील योजना शाळा पटांगणाजवळील बस डेपो जवळ मोठी मल्लखांब
स्पर्धा “अजिंक्यतारा चषक – चतुर्थ वर्ष” आयोजित केली जात आहे. या स्पर्धेला
मल्लखांबच्या अनभिषिक्त सम्राट दत्ताराम दुदम सर यांना समर्पित केले
आहे.
मुंबई उपनगरातील ४० नामवंत मल्लखांब संघातून अंदाजे ७००
खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतील. वयोगटानुसार ६, ८, १०,
१२, १४,
१६, आणि १८ वर्षांखालील मुले-मुलींची विभागणी करून वैयक्तिक आणि सांघिक दोन्ही
स्पर्धा भरविण्यात येणार आहेत. सलग दुसऱ्या वर्षी “पॅरा मल्लखांब” वयोगटातही
स्पर्धा घेण्यात येणार असून, विशेष गरजा असणाऱ्या खेळाडूंना मैदानात उतरण्याची संधी
मिळणार आहे.
स्पर्धेचे मोबदला
- सहभागी सर्व
खेळाडूंना “अजिंक्यतारा” पदक, सहभाग प्रमाणपत्र व भेटवस्तू
- प्रत्येक
वयोगटात प्रथम, द्वितीय, तृतीय स्थानांसाठी वैयक्तिक पदके
- संघटित
स्पर्धकांसाठी चषक व रोख पारितोषिके
उद्दिष्ट
मुंबई उपनगरातील नवनवीन मल्लखांबपटूंना व्यावसायिक
मार्गदर्शन देऊन भविष्यातील पुरस्कार विजेत्या खेळाडूंची शिदोरी घडवणे हे या
स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
आयोजक
सचिव: मिलिंद जोशी, स्पर्धा सचिव: संचिता देवल, स्पर्धा
प्रमुख: आशिष देवल
अधिक माहितीसाठी किंवा नोंदणीसाठी स्पर्धा प्रमुख आशिष देवल
(मो. ९६६४००२०५१) यांच्याशी संपर्क साधावा.
Post a Comment
0 Comments