Type Here to Get Search Results !

१०वी मित्सुई शोजी टी-२० क्रिकेट लीग बुधवारपासून धडाक्यात सुरू होणार! मुंबई पोलीस सिटी रायडर्स वि. घाटकोपर जेट्स या दमदार लढतीने स्पर्धेची रंगतदार सुरुवात

 


१०वी मित्सुई शोजी टी-२० क्रिकेट लीग बुधवारपासून धडाक्यात सुरू होणार!

मुंबई पोलीस सिटी रायडर्स वि. घाटकोपर जेट्स या दमदार लढतीने स्पर्धेची रंगतदार सुरुवात

 

मुंबई, ८ एप्रिल : मुंबईतील क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी! मित्सुई शोजी टी-२० क्रिकेट लीग यंदा १०व्या वर्षात पदार्पण करत असून ९ एप्रिलपासून या बहुप्रतीक्षित स्पर्धेला भव्य सुरुवात होणार आहे. ज्वाला स्पोर्ट्स फौंडेशन आणि मुंबई क्रिकेट क्लबचे संचालक ज्वाला सिंग यांच्या संकल्पनेतून २०११ साली सुरू झालेल्या या स्पर्धेने आता शहरातील एक प्रतिष्ठित क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळख निर्माण केली आहे.

 

स्पर्धेच्या उद्घाटन सामन्यात गतविजेता मुंबई पोलीस सिटी रायडर्स (३ वेळा विजेते) आणि घाटकोपर जेट्स (४ वेळा विजेते) हे दोन बलाढ्य संघ संध्याकाळी ५.३० वाजता मारिन ड्राईव्हवरील पोलीस जिमखाना मैदानावर आमनेसामने भिडणार आहेत. या सामन्याच्या माध्यमातून स्पर्धेची जोरदार सुरुवात होणार आहे.

 

मुंबई पोलीस कमिशनर विवेक फणसाळकर, एम.एल.सी. राजहंस सिंग आणि एम.एम.आर.डी.ए.चे डेप्युटी कलेक्टर दीपक चव्हाण यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मित्सुई शोजीचे सीईओ लाल भारवानी यांचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे ज्वाला सिंग यांनी नमूद केले.

 

स्पर्धेचा ढाचा :

स्पर्धेत ५ संघ सहभागी :

१.      मुंबई पोलीस सिटी रायडर्स

२.     घाटकोपर जेट्स

३.     ठाणे मराठाज

४.     शिवाजीपार्क वॉरियर्स

५.     बांद्रा हिरोज

 

प्रारंभी साखळी फेरी, त्यानंतर सुपर लीग फेरी

सुपर लीगमधून सर्वोत्तम दोन संघ ३० एप्रिल रोजी अंतिम फेरीत भिडणार

सामने पोलीस जिमखाना, ओव्हल मैदान, एअर इंडिया ग्राउंड येथे होणार

 

बक्षिसांची भरघोस रेलचेल :

अडीच लाख रुपये रोख पारितोषिके व विजेत्या संघाला भव्य ट्रॉफी

 

नामवंत खेळाडूंचा ठसा :

या स्पर्धेतून यशस्वी जैस्वाल, पृथ्वी शॉ, शिवम दुबे, अमन खान, शम्स मुलानी यांसारख्या खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. तसेच श्रीलंकेचे चामिंडा वास आणि जेहान मुबारक यांनीही या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता, यामुळेच या लीगला आंतरराष्ट्रीय स्वरूपाची प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.

 

क्रिकेटच्या मैदानी उत्सवाला साक्षी राहण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी ही स्पर्धा चुकवू नये!

अधिक माहितीसाठी संपर्क : ज्वाला सिंग – ९८२०० ४७०८१ व प्रशांत पाठारे – ९९२०३ १२३८०


Post a Comment

0 Comments