खासदार केसरी कुस्ती स्पर्धा 2025
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील ‘गदे’ ठरले मानकरी!
जोगेश्वरी (मुंबई), मा. खासदार रविंद्र वायकर प्रतिष्ठान
यांच्या वतीने आयोजित खासदार केसरी कुस्ती स्पर्धा 2025 नुकतीच
जोगेश्वरी येथे थाटात पार पडली. महाराष्ट्रातील नामवंत मल्लांच्या कुस्त्या
पाहण्यासाठी हजारो कुस्तीप्रेमींनी गर्दी केली होती.
स्पर्धेच्या अंतिम कुस्तीत महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज
पाटील 'गदे' यांनी दमदार खेळ करत मानाचा 'खासदार केसरी' किताब आपल्या नावावर केला. त्यांच्या
लढवय्या खेळीला प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करत भरभरून दाद दिली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार मा. रविंद्र
वायकर, ट्रिपल
महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव, तसेच संपत साळुंखे –
अध्यक्ष, मुंबई उपनगर तालीम संघ, आणि विनायक गाढवे – सचिव, मुंबई उपनगर
तालीम संघ हे मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी
विजेत्या मल्लांचे अभिनंदन करत कुस्ती परंपरेचा अभिमान व्यक्त केला.
या स्पर्धेद्वारे युवा मल्लांना व्यासपीठ मिळवून देत मराठी
कुस्ती परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्याचे कार्य यशस्वीपणे पार पडले.
आयोजकांनी केलेली भव्य तयारी, कुस्त्यांचा
दर्जा आणि प्रेक्षकांची उत्स्फूर्त उपस्थिती यामुळे ह्या वर्षीची 'खासदार केसरी' स्पर्धा विशेष गाजली.
Post a Comment
0 Comments