कोल्हापूर राज्य कॅरम स्पर्धेत सागर वाघमारे व समृद्धी
घाडिगावकर अग्रस्थानी
कोल्हापूर: शंभूराजे फ्रेंड्स सर्कल,
कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित राज्य मानांकन कॅरम स्पर्धेला लवकरच भव्य सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व
कोल्हापूर जिल्हा हौशी कॅरम असोसिएशन यांच्या मान्यतेने १२ ते १४ एप्रिल २०२५ दरम्यान ही स्पर्धा गंगा भाग्योदय सांस्कृतिक हॉल,
कसबा बावडा,
कोल्हापूर
येथे रंगणार आहे.
या स्पर्धेत पुरुष गटात १३४ तर महिला गटात २६ खेळाडूंनी
सहभाग नोंदवला आहे. पुरुष गटात पुण्याच्या सागर वाघमारे
तर महिला गटात ठाण्याच्या समृद्धी घाडिगावकर
हिला अग्र मानांकन मिळाले आहे.
स्पर्धेचे उद्घाटन माननीय सतेज पाटील यांच्या हस्ते
१२ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता विधान परिषदेचे आमदार
माननीय सतेज पाटील
यांच्या शुभहस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार असून त्यानंतर
लगेच पुरुष एकेरी गटातील सामने सुरू होतील. महिला एकेरी गटाचे सामने १३ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता
सुरू होतील.
थेट प्रक्षेपण व बहुभाषिक समालोचन
महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनलवरून
उपउपांत्य फेरीपासूनचे तसेच इतर महत्त्वाचे सामने
थेट प्रक्षेपित
करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे,
या सामन्यांवर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये धावते समालोचन
सुद्धा करण्यात येणार आहे.
या स्पर्धेद्वारे कोल्हापूरकरांना विश्वविजेते योगेश परदेशी,
प्रशांत मोरे
यांच्यासह राज्यातील अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय
दर्जाचे खेळाडू प्रत्यक्ष पाहण्याची अनोखी संधी मिळणार आहे.
मानांकन यादी:
पुरुष एकेरी:
१. सागर वाघमारे (पुणे), २. अनिल मुंढे (पुणे), ३. प्रशांत
मोरे (मुंबई), ४. पंकज पवार (ठाणे), ५. विकास धारिया (मुंबई), ६. संजय मांडे
(मुंबई), ७. योगेश परदेशी (पुणे), ८. हरेश्वर बेतवंशी (मुंबई)
महिला एकेरी:
१. समृद्धी घाडिगावकर (ठाणे), २. आकांक्षा कदम (रत्नागिरी), ३.
मधुरा देवळे (ठाणे), ४. प्राजक्ता नारायणकर (मुंबई उपनगर), ५. दिक्षा चव्हाण
(सिंधुदुर्ग), ६. रिंकी कुमारी (मुंबई), ७. केशर निर्गुण (सिंधुदुर्ग), ८. अंबिका
हरिथ (मुंबई)
Post a Comment
0 Comments