Type Here to Get Search Results !

विनाशुल्क शालेय सुपर लीग कॅरम स्पर्धा १ मेपासून दादरमध्ये!


विनाशुल्क शालेय सुपर लीग कॅरम स्पर्धा १ मेपासून दादरमध्ये!

 

मुंबई : माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने विनाशुल्क शालेय सुपर लीग कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त १ ते ४ मे दरम्यान दादर-पश्चिम येथील को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियन सभागृहात ही प्रतिष्ठेची स्पर्धा पार पडणार आहे.

 

राज्यातील नामवंत शालेय खेळाडूंचा सहभाग

मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आदी जिल्ह्यांतील निवडक सब-ज्युनियर कॅरमपटू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. सुपर लीग पद्धतीने सहा संघांमध्ये रोमांचक लढती रंगणार आहेत.

 

स्पर्धेची वैशिष्ट्ये :

Ø मोफत सहभागस्पर्धा संपूर्णपणे विनाशुल्क

Ø तज्ञांचे मार्गदर्शन व सराव शिबिरे

Ø सर्व खेळाडूंना टी-शर्ट व आकर्षक बक्षिसे

Ø विजेत्यांना चषक व स्ट्रायकर गिफ्ट

Ø स्पर्धेतील ड्रॉ २० एप्रिल रोजी जाहीर

 

स्पर्धेत सहभागी होणारे प्रमुख खेळाडू :

प्रसन्न व पुष्कर गोळे (पोद्दार अकॅडमी, मालाड),  स्वरा मोहिरे व स्वरा कदम (शिर्के हायस्कूल, रत्नागिरी),  उमैऱ पठाण (श्री नारायण गुरु हायस्कूल, चेंबूर), ग्रीष्मा धामणकर (आयईएस सुळे गुरुजी शाळा), मंदार पालकर, सार्थक केरकर, अमेय जंगम (पार्ले टिळक विद्यालय), तीर्थ ठक्कर (टीआरपी स्कूल, दहिसर), केवल कुलकर्णी (एसकेकेई स्कूल, मुलुंड), नील म्हात्रे, वेदांत पाटणकर, देविका जोशी, सारा देवन, निधी सावंत, अद्वैत पालांडे, अर्णव गावडे (आयईएस पाटकर विद्यालय, डोंबिवली)

 

शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिर

२० एप्रिल रोजी दादर-पश्चिम येथे को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियनच्या सभासदांच्या शालेय पाल्यांसाठी निवड चाचणी व मोफत मार्गदर्शन शिबिर होणार आहे. यावेळीच स्पर्धेच्या सामन्यांचे ड्रॉ जाहीर केले जातील.

 

यशस्वी शालेय कॅरमपटू घडवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे. आगामी डीएसओ कॅरम व बुद्धिबळ स्पर्धांसाठीही असेच उपक्रम सुरू ठेवले जाणार आहेत, अशी माहिती संयोजक लीलाधर चव्हाण व प्रमोद पार्टे यांनी दिली.

 

स्पर्धेच्या तारखा : १ ते ४ मे २०२५


स्थळ : को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियन सभागृह, दादर-पश्चिम, मुंबई.

 

 

Post a Comment

0 Comments