१०वी मित्सुई शोजी टी-२० स्पर्धा थ्रिलर मोडमध्ये!
हर्षल जाधवची अष्टपैलू
कामगिरी आणि पोलिसांचा सलग दुसरा विजय
मुंबई, ११ एप्रिल : मित्सुई शोजी टी-२० क्रिकेट स्पर्धेचा रोमांचक प्रवास अधिकच
थरारक बनत चालला आहे. काल झालेल्या दोन सामन्यांमध्ये घाटकोपर जेट्सने हर्षल जाधवच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर
बांद्रा हिरोजचा पराभव केला, तर मुंबई पोलीस सिटी रायडर्सने शिवाजी पार्क वॉरियर्सवर सहज
विजय मिळवत सलग दुसऱ्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
हर्षल जाधवची चमकदार खेळी – घाटकोपर जेट्सचा पहिला विजय
पोलीस जिमखाना येथे झालेल्या लढतीत घाटकोपर जेट्सने प्रथम
फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १७७ धावा केल्या. आर्यन पटणी (२६) आणि आदित्य श्रीवास्तव (२५) यांनी
दमदार सलामी देत संघाला चांगली सुरुवात मिळवून दिली. त्यानंतर
हर्षल जाधवने नाबाद ६६ धावा करत
आणि साई चव्हाणने नाबाद २० धावा करत संघाला मोठं लक्ष्य उभारून दिलं.
बांद्रा हिरोजने प्रयाग भाटीच्या (७३) जोरावर चांगली झुंज
दिली,
पण हर्षल जाधवने गोलंदाजीतही कमाल करत ४ महत्त्वाच्या बळी
घेतले. त्याला धानीत राऊत (२६/२) आणि यश डिचोलकर (३२/२) यांनी चांगली साथ दिली आणि
बांद्रा हिरोजला ८ बाद १६६ धावांत
रोखलं. सामनावीर ठरला – हर्षल जाधव.
पोलिसांचा पराक्रम कायम – दुसरा सलग विजय
ओव्हल मैदानावर (सचिवालय जिमखाना) झालेल्या दुसऱ्या
सामन्यात,
मुंबई पोलीस सिटी रायडर्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा
निर्णय घेत शिवाजी पार्क वॉरियर्सला अवघ्या ८१ धावांत गारद केलं. मध्यमगती गोलंदाज योगेश पाटीलने १७ धावांत ३ बळी घेतले, तर अमोल तनपुरे (२४/२) आणि आर्यराज निकम (६/२) यांनीही भेदक मारा केला. वॉरियर्सकडून केवळ
सुवेद पारकर (३३)
काहीसा प्रतिकार करू शकला.
पोलिसांनी हे छोटे लक्ष्य १०.३ षटकांतच गाठलं. हर्ष साळुंखेने नाबाद ५५ धावा,
तर हर्ष आघावने नाबाद १० धावा करत विजय साकारला. सामनावीर
ठरला – योगेश
पाटील.
सामन्यांचा संक्षिप्त आढावा :
पोलीस जिमखाना
घाटकोपर जेट्स – १७७/६ (हर्षल जाधव नाबाद ६६, आर्यन पटणी २६; अनुज गिरी २/१९, निशांत त्रिवेदी २/२८)
बांद्रा हिरोज –
१६६/८ (प्रयाग भाटी ७३; हर्षल जाधव ४/२३, धानीत राऊत २/२६, यश डिचोलकर २/३२)
सामनावीर – हर्षल जाधव
ओव्हल मैदान (सचिवालय जिमखाना)
शिवाजी पार्क वॉरियर्स – ८१ सर्वबाद (सुवेद पारकर ३३; योगेश पाटील ३/१७, अमोल तनपुरे २/२४, आर्यराज निकम २/६)
मुंबई पोलीस सिटी रायडर्स –
८२/२ (हर्ष साळुंखे नाबाद ५५)
सामनावीर – योगेश पाटील
Post a Comment
0 Comments