ठाण्यात श्री मावळी मंडळाच्या शताब्दी वर्षानिमित्त
राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार २५ एप्रिलपासून!
ठाणे : ठाणे येथील श्री मावळी मंडळ संस्था आपल्या शताब्दी वर्ष आणि शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधत राज्यभरातील कबड्डीप्रेमींसाठी एक खास पर्वणी घेऊन येत
आहे. २५
एप्रिल ते २९ एप्रिल २०२५ या कालावधीत राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा
भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे एकूण
₹
५,००,०००/- ची दमदार पारितोषिक रक्कम,
जी स्पर्धेतील विजेत्या संघांसह उत्कृष्ट खेळाडूंना
सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
पारितोषिकांचे संपूर्ण तपशील :
पुरुष गट:
या स्पर्धेत पुरुष गटात विजेत्या संघाला ₹
१,००,०००/- , उपविजेत्या संघाला ₹ ७५,०००/- व उपांत्य फेरीतील पराभूत संघाला ₹
२५,०००/- रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
महिला गट:
महिला गटात विजेत्या संघाला ₹ ५५,०००/- , उपविजेत्या
संघाला ₹
४४,०००/- व उपांत्य फेरीतील पराभूत संघाला ₹
२२,०००/- रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
विशेष वैयक्तिक सन्मान:
पुरुष गटात व महिला
गटात उत्कुष्ट खेळाडूस ₹ १०,०००/- , उत्कुष्ट चढाईपट्टू
खेळाडूस ₹ ५,०००/- व उत्कुष्ट पक्कड करणाऱ्या खेळाडूस ₹ ५,०००/- रोख रक्कम देऊन
गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेतील प्रत्येक दिवसाच्या उत्कृष्ट खेळाडूस ₹ २,०००/- रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे.
नोंदणी प्रक्रिया :
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संघांनी
१८ एप्रिल २०२५
पर्यंत आपले प्रवेश अर्ज सादर करावेत.
अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण:
श्री मावळी मंडळ कार्यालय,
ठाणे किंवा Maharashtrakabaddi.com या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज उपलब्ध
श्री मावळी मंडळाच्या या उपक्रमामुळे कबड्डी खेळाडूंना
उत्तम व्यासपीठ मिळणार असून, कबड्डीचा थरार, कौशल्य आणि संघभावनेचा जल्लोष ठाण्यात पाहायला मिळणार आहे.
"खेळातून आरोग्य आणि राष्ट्रनिर्मिती"
या संकल्पनेला बळकटी देणारी ही स्पर्धा नक्कीच संस्मरणीय
ठरणार!
Post a Comment
0 Comments