डॉ. बाबासाहेब आंबेडकर टी-ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धा
विश्वजीत, कुणाल आणि सौरभच्या तुफानी खेळीमुळे मफतलाल एससी अंतिम फेरीत
मुंबई, ९
एप्रिल: जोरदार फॉर्मात असलेल्या मफतलाल एससीने दमदार कामगिरी करत डॉ.
बाबासाहेब आंबेडकर टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम
फेरीत आपले स्थान पक्के केले. चेंबूर येथील आरसीएफ
स्पोर्ट्स क्लबवर झालेल्या उपांत्य फेरीत, मफतलालने स्पेस
स्पोर्ट्स क्लबचा ८२ धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
प्रथम फलंदाजी करताना मफतलालने 20 षटकांत 6 बाद 230
धावा ठोकल्या.
संघाचे नेतृत्व करणाऱ्या विश्वजीत जगदाळेने नाबाद 68 धावांची धमाकेदार खेळी साकारली. त्याने केवळ 38 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकार मारत संघाचा डाव भक्कम केला.
तत्पूर्वी, सलामीवीर
कुणाल नरने 24 चेंडूत 51 धावा करताना 4 चौकार आणि 5 षटकार फटकावले. तर सौरभ सिंगने अवघ्या 14 चेंडूत
49 धावा करत 2 चौकार आणि तब्बल 6 षटकारांसह खेळपट्टी गाजवली.
प्रत्युत्तरात, स्पेस स्पोर्ट्स क्लबचा डाव 16.4 षटकांत 148
धावांवर आटोपला. रोहन गज्जरने 27
चेंडूत 56 धावा (3 चौकार,
5 षटकार) करत झुंज दिली. आदित्य परबने 37 धावा केल्या, पण अन्य
फलंदाज सपशेल अपयशी ठरले.
गोलंदाजीत साहिल फेगडेने 4/16, कार्तिक मिश्राने 3/30 आणि अजय मिश्राने 2/41
अशी उत्तम कामगिरी करत मफतलालच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
निकाल: मफतलाल
एससी स्पेस स्पोर्ट्स क्लबवर ८२ धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत.
Post a Comment
0 Comments