नवमित्र क्रीडा मंडळाची सुवर्ण महोत्सवी कबड्डी स्पर्धा!
मुंबई: वरळीच्या नवमित्र क्रीडा मंडळाने आपल्या “सुवर्ण महोत्सवी”
वर्षानिमित्त द्वितीय श्रेणी (ब) गटातील
कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. हा उपक्रम २३ एप्रिल ते २६ एप्रिल या कालावधीत वरळी आदर्श नगरमधील वरळी स्पोर्ट्स क्लबच्या
मैदानावर मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या
मान्यतेने होणार आहे.
संघांचा जल्लोष:
मुंबईतील १६ नामवंत संघांमध्ये ओम् ज्ञानदीप,
अमर मंडळ आदींचा समावेश असून, आज सायंकाळी ६:३० वाजता ओम् ज्ञानदीप विरुद्ध अमर मंडळ या थरारक सामन्याने
स्पर्धेला शुभारंभ होईल.
पुरस्कार :
नवमित्र चषक व रोख रक्कम – अंतिम विजेत्या व उपविजेत्या संघांना (स्व.
दीपक वेर्लेकर स्मरणार्थ)
शिंदे शाखा क्र.१९७ चषक व रोख – उपांत्य उपविजेत्या संघांना
सर्वोत्तम खेळाडू, पकड, चढाई – चषक + आकर्षक भेटवस्तू
प्रतिदिन उत्कृष्ट मानकरी
– रोख बक्षीस
अंतिम विजेत्या व उपविजेत्या संघातील १२ खेळाडू
– प्रत्येकी खास भेटवस्तू
उद्घाटन सोहळा:
विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर, आमदार सुनील शिंदे, आणि शिवछत्रती पुरस्कारप्राप्त तारक राऊळ यांच्या उपस्थितीने स्पर्धेचे विधिवत उद्घाटन.
Post a Comment
0 Comments