Type Here to Get Search Results !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर टी-ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धा आरसीएफ एससीचे आव्हान समाप्त – विवा सुपरमार्केटचा दमदार विजय


डॉ. बाबासाहेब आंबेडकर टी-ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धा

आरसीएफ एससीचे आव्हान समाप्त – विवा सुपरमार्केटचा दमदार विजय

 

मुंबई : चेंबूरच्या आरसीएफ स्पोर्ट्स ग्राउंडवर सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर टी-ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेच्या सुपर नॉकआउट सामन्यात यजमान आरसीएफ एससीचा पराभव झाला. विवा सुपरमार्केटने 4 विकेट राखून विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला.

 

सागर गुप्ताचा झुंजार अर्धशतक व्यर्थ

प्रथम फलंदाजी करताना आरसीएफ एससीने 20 षटकांत 9 बाद 143 धावा केल्या. सलामीवीर सागर गुप्ताने 70 धावा (50 चेंडू, 6 चौकार, 1 षटकार) फटकावत संघाला भक्कम सुरुवात करून दिली. मात्र, अन्य फलंदाज त्याचा फारसा साथ देऊ शकले नाहीत. सूरज सुभाष (20) आणि सचिन काकडकर (12) वगळता कोणत्याच फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. विवा सुपरमार्केटकडून पार्थ नाईकने 3 विकेट घेत आरसीएफच्या डावाला खिंडार पाडले.

 

विवा सुपरमार्केटचा सहज विजय

144 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विवा सुपरमार्केटने 15.3 षटकांत 6 बाद 144 धावा करत सहज विजय मिळवला. सलामीवीर जिगर सुरेंद्राने 17 चेंडूंत 34 धावा (6 चौकार, 1 षटकार) ठोकत वेगवान सुरुवात करून दिली. श्रेयस गुरव (नाबाद 30), ऋतुराज (24) आणि सौरभ पवार (24) यांचे मोलाचे योगदान संघाच्या विजयासाठी निर्णायक ठरले.

 

दुसऱ्या सामन्यात ऑटोमोटिव्ह सीसीचा दमदार विजय

दुसऱ्या सामन्यात ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरर्स सीसीने डीएम क्रिकेट क्लबचा (डीएमसीसी) 5 विकेटने पराभव केला. डीएमसीसीने दिलेले 183 धावांचे लक्ष्य ऑटोमोटिव्ह सीसीने 18.3 षटकांत पार केले. आदित्य शेमाडकरच्या तडाखेबंद 70 धावांच्या खेळीत (36 चेंडू, 5 चौकार, 5 षटकार) शानदार योगदान दिले. याआधी डीएमसीसीसाठी ओम भोसलेने 65 धावा करत संघाला 20 षटकांत 8 बाद 182 धावापर्यंत मजल मारून दिली होती.

 

संक्षिप्त धावफलक:

आरसीएफ एससी: 20 षटकांत 9 बाद 143, (सागर गुप्ता 70, सूरज सुभाष 20; पार्थ नाईक 3/16)

 

विवा सुपरमार्केट: 15.3 षटकांत 6 बाद 144, (जिगर सुरेंद्र 34, श्रेयस गुरव नाबाद 30)


Post a Comment

0 Comments