Type Here to Get Search Results !

ज्ञानेश्वर विद्यालयाचा वार्षिक क्रीडा पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न


ज्ञानेश्वर विद्यालयाचा वार्षिक क्रीडा पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

 

मुंबई (वडाळा) : ज्ञानेश्वर विद्यालयाचा वार्षिक क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा शालेय क्रीडापटूंच्या उत्स्फूर्त सहभागात व जल्लोषात पार पडला. यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण, संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष धैर्यशील जाधव, उपाध्यक्ष दिलीप महाडिक, सचिव सूर्यकांत कोरे, खजिनदार भास्कर सावंत, मुख्याध्यापक महेंद्र पाटील तसेच माजी विद्यार्थी मितेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

कबड्डी, क्रिकेट, लंगडी, फुटबॉल, अ‍ॅथलेटिक्स यांसारख्या विविध खेळांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. प्रत्येक क्रीडा प्रकारातील पहिल्या तीन विजेत्यांना गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

 

विद्यार्थ्यांच्या खेळगुणांचा गौरव

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लीलाधर चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्या उत्तम क्रीडा कामगिरीचे कौतुक करताना शाळा व्यवस्थापन व शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, “ज्ञानेश्वर विद्यालयाने वर्षाच्या प्रारंभीच आंतरशालेय कबड्डी स्पर्धा जिंकून क्रीडाक्षेत्रात आपली चुणूक दाखवली आणि राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त यशस्वीपणे कॅरम स्पर्धा पार पाडली, ही विशेष बाब आहे.”

 

शैक्षणिक आणि क्रीडा समतोलाचा उत्तम प्रयत्न

शाळेने विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर ठेवत, दर महिन्याला विविध खेळांची सुसंघटित आखणी करून त्यांचा शारीरिक विकास साधण्याचा प्रयत्न केला, याचेही विशेष कौतुक चव्हाण यांनी केले. ते पुढे म्हणाले, “शाळा केवळ खेळापुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती वाढवते आहे व शैक्षणिक प्रगतीकडेही लक्ष देत आहे, हे खरोखरच उल्लेखनीय आहे.”

 

संस्थेचा पुढाकार प्रेरणादायी

संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील जाधव यांनीही शाळेच्या सर्व शिक्षकवर्गाचे अभिनंदन करताना विद्यार्थ्यांचा उत्साह आणि शिस्तबद्ध सहभाग या सोहळ्याचे वैशिष्ट्य असल्याचे नमूद केले.

 

ज्ञानेश्वर विद्यालयाचा हा वार्षिक क्रीडा सोहळा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा आणि क्रीडामानसाला चालना देणारा ठरला. विद्यालयाने दिलेला खेळ व शिक्षण यांचा सुंदर मेळ हा खरोखरच इतरांसाठी आदर्शवत आहे.


Post a Comment

0 Comments