Type Here to Get Search Results !

कुर्ला येथे हनुमान क्रीडा मंडळातर्फे शालेय मुलांसाठी मोफत कॅरम स्पर्धा


 

कुर्ला येथे हनुमान क्रीडा मंडळातर्फे शालेय मुलांसाठी मोफत कॅरम स्पर्धा

 

मुंबई (कुर्ला) : हनुमान क्रीडा मंडळ, कुर्ला (पश्चिम) यांच्या वतीने ६१व्या हनुमान जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी १६ वर्षांखालील मोफत कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा गुरुवार, १० एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता मंडळाच्या पटांगणावर रंगणार आहे.

 

स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट शालेय विद्यार्थ्यांमध्ये कॅरमप्रती आवड निर्माण करणे आणि त्यांना खेळाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देणे, असे आयोजकांनी सांगितले.

 

आकर्षक पारितोषिकांची लज्जतदार मेजवानी

या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रथम ८ खेळाडूंना आकर्षक चषक प्रदान करण्यात येणार आहेत, तर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पदकांनी गौरविण्यात येणार आहे.

 

स्पर्धेसाठी नावनोंदणी सुरू असून इच्छुक खेळाडूंनी अविनाश महाडीक – ९००४७५४५०७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

सप्ताह आणि स्पर्धा — एक आध्यात्मिक आणि क्रीडामय संगम

स्पर्धेसोबतच मंडळातर्फे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजनही करण्यात आले आहे. त्यामुळे भक्तिमार्ग आणि क्रीडामार्गाचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी भाविक आणि नागरिकांना मिळणार आहे.

 

मंडळाचे अध्यक्ष कमलाकर बने यांनी सांगितले की, “स्पर्धा आणि हरिनाम सप्ताहाचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी घ्यावा, हा आमचा उद्देश आहे. हनुमान जयंतीचे औचित्य साधून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे, हेच आमचे कार्य.”


Post a Comment

0 Comments