Type Here to Get Search Results !

आरएफएस तल्यारखान स्मृती निमंत्रित टी-२० क्रिकेट स्पर्धा एमसीए कोल्ट्स व पारसी जिमखाना फायनलमध्ये आमनेसामने

 


आरएफएस तल्यारखान स्मृती निमंत्रित टी-२० क्रिकेट स्पर्धा

एमसीए कोल्ट्स व पारसी जिमखाना फायनलमध्ये आमनेसामने

 

मुंबई : आरएफएस तल्यारखान स्मृती निमंत्रित टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आता एमसीए कोल्ट्स पारसी जिमखाना हे दोन बलाढ्य संघ आमने-सामने येणार आहेत. दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत प्रभावी विजय मिळवले.

 

पहिल्या उपांत्य सामन्यात, जय बिस्ताने जबरदस्त १२० धावांची खेळी करत पी. जे. हिंदू जिमखानासाठी धावसंख्या उभारली होती. त्यांनी २० षटकांत ९ बाद १८३ धावा केल्या. मात्र, एमसीए कोल्ट्सने हे लक्ष्य १९.४ षटकांत ६ विकेट राखून पूर्ण केले. दिव्यांश सक्सेनाने ८ चौकार आणि एका षटकारासह ६२ धावा करत विजयात मोलाची भूमिका बजावली. त्याला सुवेद पारकरने २९ धावांची उपयुक्त साथ दिली.

 

दुसऱ्या उपांत्य सामन्यात, सीसीआयने ५ बाद २०३ धावा करत मजबूत आव्हान दिले होते. पण पारसी जिमखाना संघाने हे लक्ष्य १९.३ षटकांत ४ गडी राखून पार केले. ईशान मुलचंदानीने ३७ चेंडूत ७४ धावा ठोकत डावाला गती दिली. केविन अल्मेडा (३६ नाबाद), शम्स मुलानी (२८) आणि सागर छाब्रिया (२६ नाबाद) यांनी संयमी खेळी करत विजयावर शिक्कामोर्तब केला. सीसीआयसाठी आकाश आनंदने ४८ चेंडूत १४ चौकारांसह नाबाद ८४ धावा फटकावत आघाडी घेतली होती.

 

संक्षिप्त धावफलक:

उपांत्य फेरी – १: पी. जे. हिंदू जिमखाना१८३/९ (२० षटकांत)

(जय बिस्ता १२० (७६ चेंडू, x, x४); धनित राऊत ३/२६, शशांक अत्राडे २/१८, अथर्व अंकोलेकर २/३४)

विरुद्ध : एमसीए कोल्ट्स१८४/६ (१९.४ षटकांत)

(दिव्यांश सक्सेना ६२ (४१ चेंडू, x, x६), सुवेद पारकर २९; मोहित अवस्थी ३/३९, प्रतीक मिश्रा २/२९)


निकाल: एमसीए कोल्ट्स ४ विकेट राखून विजयी

 

उपांत्य फेरी – २: सीसीआय २०३/५ (२० षटकांत)
(
आकाश आनंद ८४* (४८ चेंडू, १४x४), चिन्मय सुतार ३८; आयुष वर्तक २/२२)


विरुद्ध : पारसी जिमखाना२०४/४ (१९.३ षटकांत)

(ईशान मुलचंदानी ७४ (३७ चेंडू, x, x६), केविन अल्मेडा ३६*, शम्स मुलानी २८, सागर छाब्रिया २६*; ऐश्वर्य सुरवे २/३२)


निकाल: पारसी जिमखाना ६ विकेट राखून विजयी


Post a Comment

0 Comments