नवोदित संघ, आकांक्षा मंडळ, अमर क्रीडा मंडळ आणि शिवमुद्रा प्रतिष्ठा उपांत्य फेरीत धडक
मुंबई (प्रभादेवी) –जुनी प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
आयोजित, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र. १९३
पुरस्कृत, आणि मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने होत असलेल्या "स्व. अनंतशेठ नागवेकर
चषक कुमार गट" जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत आजच्या सामन्यांमधून
नवोदित संघ,
आकांक्षा मंडळ,
अमर क्रीडा मंडळ आणि
शिवमुद्रा प्रतिष्ठान यांनी उपांत्य फेरी गाठली आहे.
दिवसातील सामन्यांचे थरार:
नवोदित संघ ४२ – ३१ श्री संस्कृती प्रतिष्ठान
सामन्याच्या सुरुवातीला रोशन रायने लोण देत संस्कृतीला
आघाडी मिळवून दिली, पण अथर्व
सुवर्णा आणि ऋषिकेश मालवी यांच्या शानदार खेळीने नवोदितने सामन्यावर पकड मिळवली आणि
सहज विजय मिळवला.
आकांक्षा मंडळ ४३ – ४१ गोलफादेवी
स्वप्नील पवारच्या निर्णायक चढाईमुळे आणि तेजस सावंत, सुमित मिसाळ यांच्या पकडीमुळे अतिशय अटीतटीच्या सामन्यात आकांक्षाने
विजय खेचून आणला. गोलफादेवीकडून विनम्र लाड, सनी कोळी यांनी झुंजार प्रयत्न केला, पण तो अपुरा ठरला.
अमर क्रीडा मंडळ ४५ – ४१ विजय क्लब
रमेश रायकर, विघ्नेश जावरे, रोहित शिंदे यांच्या सांघिक कामगिरीने अमर मंडळाने पिछाडीवरून पुनरागमन
करत विजय साधला. विजय क्लबकडून रोहन तिवारीचा उत्तम खेळ झळकला पण संघ विजय मिळवू शकला नाही.
शिवमुद्रा प्रतिष्ठान ४८ – ४३ एस.एस.जी.
विशाल लाडच्या चतुरस्त्र खेळामुळे शिवमुद्राने उत्तरार्धात शानदार कामगिरी करत विजय मिळवला.
विश्रांतीला एस.एस.जी.कडे २५-२१ अशी आघाडी होती,
पण ती त्यांनी राखता आली नाही.
Post a Comment
0 Comments