Type Here to Get Search Results !

अमोघ गावडेच्या झंझावाती शतकाने यंग पारसीचा दणदणीत विजय!


अमोघ गावडेच्या झंझावाती शतकाने यंग पारसीचा दणदणीत विजय!

 

मुंबई : अमोघ गावडेच्या नाबाद १०८ धावांच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर यंग पारसी क्रिकेट क्लबने मुंबई जूनियर शिल्ड २०२५ स्पर्धेत शानदार विजय मिळवला. श्री माटुंगा गुजराती सेवा मंडळ विरुद्धच्या सामन्यात १५९ धावांचे आव्हान त्यांनी सहज पार करत ६ गडी राखून सहज जिंकले.

 

माटुंगा गुजराती मंडळाची १५९ धावांची मजल

क्रॉस मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात युनायटेड क्रिकेटर्सच्या खेळपट्टीवर श्री माटुंगा गुजराती सेवा मंडळाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, ३६ षटकांत सर्वबाद १५९ धावांपर्यंतच मजल मारता आली. सलामीवीर ऋषीने ३१ धावा करत चांगली सुरुवात दिली. मध्यफळीतील आदित्य कोळीने ३९ धावा आणि आसिफ इमानदारने नाबाद ३५ धावा करत संघाचा डाव सावरला. यंग पारसीसाठी अभिनेव पुजारी आणि फैयाज शेख यांनी प्रत्येकी ३ गडी घेत माटुंगा संघाला रोखून धरले.

 

अमोघ गावडेच्या दमदार शतकाने यंग पारसी विजयी

१५९ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या यंग पारसी संघाने ३९.३ षटकांतच हे लक्ष्य पार केले. यामध्ये सलामीवीर अमोघ गावडेच्या अप्रतिम नाबाद १०८ धावा निर्णायक ठरल्या.


१२२ चेंडूंत ८ चौकार आणि ५ षटकारांसह अमोघने झंझावाती खेळी साकारली. त्याला साहिल सोनीने ३९ धावांची नाबाद साथ देत विजय सुकर केला.


अमोघ गावडेच्या या जबरदस्त शतकामुळे यंग पारसी क्रिकेट क्लबने ६ गडी राखून सहज विजय मिळवत स्पर्धेत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली!


Post a Comment

0 Comments