सुप्रिमो चषक टेनिस क्रिकेट स्पर्धा
बालाजी क्लबची विजयी घोडदौड
एंजेल धमाका संघाची जिद्दीची झलक
मुंबई –
सांताक्रूज-कालिना
येथील एअर इंडिया मैदानावर सुरू असलेल्या सुप्रिमो चषक
टेनिस क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी खऱ्या अर्थानं "क्रिकेटचा
झंझावात" पाहायला मिळाला. मुंबईच्या बालाजी क्लबने जबरदस्त खेळी करत अंतिम फेरीकडे मजबूत पावलं टाकलं,
तर कोलकात्याच्या एंजेल धमाका संघाने आपल्या जिद्दीच्या खेळीने प्रेक्षकांचे टाळ्या मिळवल्या.
पहिला विजय – बालाजी क्लबचा संतुलित खेळ
पहिल्या सामन्यात बालाजी क्लब, मुंबई ने दीपक दादा प्रतिष्ठान ग्लोरिअस मैत्री,
सिंधुदुर्ग
संघावर १३ धावांनी मात करत शानदार सुरुवात केली.
फर्दिन काझीच्या धडाकेबाज २१ चेंडूत ३९ धावांच्या खेळीने संघाला ८
षटकांत ७२ धावांचा टप्पा गाठता आला.
सिंधुदुर्ग संघाने झुंज दिली, मात्र प्रज्वल कर्नाटकच्या ३ बळींच्या जोरावरही केवळ ५९
धावांपर्यंतच मजल मारू शकला.
मॅन ऑफ द मॅच – फर्दिन काझी
दुसरा विजय – एंजेल धमाका कोलकात्याची तुफान बॅटिंग
दुसऱ्या सामन्यात एंजेल धमाका, कोलकत्ता संघाने विक्रोळीअन्स रोहित XI, मुंबई संघाविरुद्ध शक्तिशाली खेळी सादर करत २९ धावांनी विजय
मिळवला. संजू कनोजीयाच्या २१ धावा आणि
साहिल लोंगळेच्या २ बळींनी ८६ धावांचा डोंगर उभारला.
मंगेश वैतीच्या ४२ धावांच्या झुंजार प्रयत्नाला प्रतिसाद न
मिळाल्याने विक्रोळीअन्स संघ ५७ धावांवर गारद झाला.
मॅन ऑफ द मॅच – जगत सरकार
उपउपांत्य फेरी : बालाजी क्लब वि.
एंजेल धमाका –
अटीतटीची लढत
या दोन विजयी संघांमध्ये झालेला उपउपांत्य फेरीतील सामना
प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरला. एंजेल धमाकाने प्रथम फलंदाजी करत ८ षटकांत ६७ धावा केल्या.
सरोज प्रामाणिकच्या २७ धावा आणि इमरोझ खानच्या
जबरदस्त ४ बळींनी सामन्याचं चित्र बदललं.
प्रत्युत्तरात बालाजी क्लब ने केवळ ६ षटके २ चेंडूत ४ गडी गमावत ७१ धावा करत विजय
साकारला.
मॅन ऑफ द मॅच – इमरोझ खान
Post a Comment
0 Comments