"सुप्रिमो चषक म्हणजे झंझावातच!" – उद्धव ठाकरे यांचे गौरवोद्गार
मुंबई : “गेली अकरा वर्षे सुप्रिमो चषक स्पर्धा जोमात सुरु ठेवणे आणि
तिचे वैभव वर्षानुवर्षे वाढवत नेणे ही सोपी गोष्ट नाही. सुप्रिमो चषक म्हणजे एक झंझावातच आहे!”
– अशा शब्दांत शिवसेना (उद्धव
बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या भव्य स्पर्धेचे कौतुक करताना
गौरवोद्गार काढले.
सांताक्रूज येथील एअर इंडिया मैदानावर सुप्रिमो चषक क्रिकेट
स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. टेनिस क्रिकेटच्या ‘वर्ल्डकप’
म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेचे हे ११वे वर्ष असून,
उद्घाटनाचा भार उद्धव ठाकरे यांनी सांभाळला.
क्रिकेट वि राजकारण – हलक्याफुलक्या शैलीत टोलेबाजी
ठाकरे यांनी आपल्या विनोदी शैलीत राजकारण आणि क्रिकेट यांची
तुलना करत म्हणाले, “आजकाल आयपीएल दोन्हीकडे आहे – क्रिकेटमध्ये आणि राजकारणात! कोण कुठल्या पक्षात
आहे तेच कळेनासं झालंय. कमीत कमी क्रिकेटमध्ये तरी मनोरंजन होतं!” – त्यांच्या या
वक्तव्याने सभागृहात हास्यकल्लोळ उसळला.
सुप्रिमोचा झंझावात देशभरात
ठाकरे यांनी स्पर्धेच्या वाढत्या व्याप्तीचे कौतुक करत
म्हटले,
“ही स्पर्धा आता महाराष्ट्रापुरती
उरलेली नाही. देशभरातून नामांकित संघ येथे खेळण्यासाठी येत आहेत,
हे अभिमानास्पद आहे.” त्यांनी यापुढे सांगितले की,
“या स्पर्धेचा अंतिम सामना
ब्रेबॉर्न किंवा वानखेडे स्टेडियमवरच होणे गरजेचे आहे. आणि एक सामना दिल्लीतही
व्हावा!”
विविध राज्यांतील संघांचा सहभाग
या वर्षी दिल्ली, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, कोलकाता, गोवा, केरळ, राजकोट येथून आलेले १६ अव्वल संघ या स्पर्धेत सहभागी झाले
आहेत. विशेष म्हणजे कर्नाटकच्या एफ. एम. हॉस्पेट संघातून श्रीलंकेच्या
आंतरराष्ट्रीय खेळाडूचा सहभाग प्रेक्षकांसाठी आकर्षणाचा विषय ठरतो आहे.
बक्षिसांचा पाऊस!
या स्पर्धेतील बक्षिसांची रक्कमही क्रिकेटरसिकांना थक्क
करणारी आहे
विजेत्या संघाला ₹१२ लाख रोख + प्रत्येक खेळाडूसाठी बाईक
मॅन ऑफ द सिरीज – मारुती कार
उपविजेता संघ – ₹१० लाख रोख
सर्वोत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज
– प्रत्येकी बाईक
उपस्थित मान्यवर
उद्घाटन सोहळ्यात आमदार ॲड. अनिल परब,
आमदार संजय पोतनिस, माजी क्रिकेटपटू प्रवीण आंब्रे आणि विविध क्षेत्रातील
मान्यवरांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
Post a Comment
0 Comments