Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय किशोर/किशोरी गट कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघांची घोषणा सेरेना म्हसकर व आर्यन पवार यांच्याकडे संघाची जबाबदारी





राष्ट्रीय किशोर/किशोरी गट कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघांची घोषणा


सेरेना म्हसकर व आर्यन पवार यांच्याकडे संघाची जबाबदारी


मुंबई – अखिल भारतीय कबड्डी महासंघाच्या मान्यतेने आणि बिहार राज्य कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने गया, बिहार येथे होणाऱ्या ३४व्या किशोर व किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राने आपले दोन्ही संघ जाहीर केले आहेत. किशोरी गटाचे नेतृत्व मुंबई उपनगरच्या सेरेना म्हसकरकडे, तर किशोर गटाचे नेतृत्व परभणीच्या आर्यन पवारकडे सोपविण्यात आले आहे.


ही स्पर्धा २७ ते ३० मार्च २०२५ दरम्यान जी. डी. गोयंका पब्लिक स्कूल, रसलपूर, गया (बिहार) येथे मॅटवर पार पडणार आहे. नुकत्याच मनमाड, नाशिक येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेतून या संघांची निवड करण्यात आली आहे. सध्या हे दोन्ही संघ मनमाड येथे सराव शिबिरात आहेत.


महाराष्ट्राचे संघ –

किशोरी गट (मुली)

1. सेरेना म्हसकर - संघनायिका (मुंबई उपनगर पूर्व), 2. यशश्री इंगोले (परभणी), 3. बिदिशा सोनार (नाशिक शहर), 4. समृद्धी लांडगे (पिंपरी चिंचवड), 5. प्रतिक्षा राठोड (परभणी), 6. सानिका पाटील (सांगली), 7. सेजल काकडे (नाशिक ग्रामीण), 8. तनुजा ढेरंगे (नाशिक शहर), 9. नंदा नागवे (जालना), 10. आर्या लवार्डे (पुणे शहर), 11. सिद्धी लांडे (पिंपरी चिंचवड), 12. ईशा दारोळे (नाशिक शहर)

प्रशिक्षक: शरद पाटील, व्यवस्थापिका: क्षिप्रा पैठणकर



किशोर गट (मुले)

1. आर्यन पवार - संघनायक (परभणी), 2. तुकाराम दिवटे (जालना), 3. सारंग उंडे (नंदुरबार), 4. मनीष काळजे (पिंपरी चिंचवड), 5. किशोर जगताप (परभणी), 6. विश्वजित सुपेकर (उस्मानाबाद), 7. ऋतुराज महानवर (पिंपरी चिंचवड), 8. श्रेयस लाले (रत्नागिरी), 9. निखिल गायकर (ठाणे ग्रामीण), 10. समर्थ ठोंबरे (कोल्हापूर), 11. सुयोग सोनवणे (जळगाव), 12. किरण कोळी (पुणे शहर)

प्रशिक्षक: संग्राम मोहिते, व्यवस्थापक: वाल्मीक बागुल


महाराष्ट्राच्या दोन्ही संघांकडून उत्कृष्ट खेळाची अपेक्षा असून, कबड्डी प्रेमींना या स्पर्धेत त्यांच्या दमदार कामगिरीची उत्सुकता आहे.

Post a Comment

0 Comments