Type Here to Get Search Results !

राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत प्रशांत मोरे आणि संदीप दिवेची आगेकूच


राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत प्रशांत मोरे आणि संदीप दिवेची आगेकूच

 

मुंबई: प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, विले पार्ले येथे सुरू असलेल्या रोटरी क्लब ऑफ पार्लेश्वर मुंबई आयोजित आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती, जुहू यांच्या सहयोगाने तसेच उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत ५ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरी गटाच्या चौथ्या फेरीत माजी विश्वविजेता व विद्यमान राष्ट्रीय विजेता प्रशांत मोरेने दमदार प्रदर्शन करत आगेकूच केली.

 

मुंबईच्या नीरज कांबळेला त्याने सरळ दोन सेटमध्ये २५-७, २०-११ असे सहज पराभूत केले. दुसऱ्या महत्त्वाच्या सामन्यात मुंबई उपनगरच्या माजी विश्वविजेत्या संदीप दिवेने रोमांचक लढतीत संजय मोहितेवर २२-४, २०-२४, २५-५ असा विजय मिळवत पाचव्या फेरीत प्रवेश केला.

 

पुरुष एकेरी चौथ्या फेरीचे निकाल:

मंगेश पंडित (मुंबई उपनगर) वि. अजगर शेख (मुंबई उपनगर)२५-८, १६-११


प्रफुल मोरे (मुंबई) वि. सार्थक नागावकर (मुंबई)२५-८, २५-१०


सिद्धांत वाडवलकर (मुंबई) वि. संजय मणियार (मुंबई उपनगर)१६-२०, ४-२५, २५-२


ब्लेसिंग सॅमी (ठाणे) वि. संदेश मांजलकर (पालघर)१८-१५, २०-१८


शेख महम्मद रझा (मुंबई) वि. सौरभ मते (मुंबई)६-२५, १५-११, २१-१६


सुरज कुंभार (मुंबई) वि. सुखबीरसिंग कटनोरिया (पुणे)९-२५, २५-०, २२-१८


हिदायत अन्सारी (मुंबई) वि. शरद मोरे (मुंबई उपनगर)२५-०, २५-१


अभिजित त्रिपांकर (पुणे) वि. योगेश कोंडविलकर (रत्नागिरी)२५-४, २५-६


अश्रफ खान (रायगड) वि. जितेश कदम (मुंबई उपनगर)२५-०, २५-१६


Post a Comment

0 Comments