Type Here to Get Search Results !

ओरिएंटल इन्शुरन्स शील्ड टी-ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धा मुंबई पोलीस जिमखाना अंतिम फेरीत न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्सवर १० विकेट राखून विजय

 


ओरिएंटल इन्शुरन्स शील्ड टी-ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धा

मुंबई पोलीस जिमखाना अंतिम फेरीत

न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्सवर १० विकेट राखून विजय

 

मुंबई, २५ मार्च: मुंबई पोलीस जिमखाना संघाने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स एससी संघावर १० विकेट राखून सहज विजय मिळवला आणि ओरिएंटल इन्शुरन्स शील्ड टी-ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.

 

क्रॉस मैदानावर खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीत, नाणेफेक जिंकून न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स एससीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय त्यांच्यासाठी घातक ठरला. मुंबई पोलीस जिमखान्याच्या गोलंदाजांनी अप्रतिम मारा करत प्रतिस्पर्धी संघाला अवघ्या 16.3 षटकांत 73 धावांवर रोखले. हशिम सय्यद (३/१८), निशित भल्ला (२/८) आणि महादेव कदम (२/२२) यांनी प्रभावी गोलंदाजी करत विरोधी फलंदाजांना जखडून ठेवले. न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स एससीकडून संस्कार दहेलकर (३६), शौरी नगर (१४) आणि अनिश शेट्टी (११) यांनी दोन आकडी धावा केल्या.

 

मुंबई पोलीस जिमखान्याच्या जयेश चंदनकर (नाबाद ४१) आणि तन्मय मयेकर (नाबाद ३४) यांनी ७.१ षटकांतच संघाला विजय मिळवून दिला. एकही विकेट न गमावता त्यांनी सहज लक्ष्य पार केले.

 

मुंबई पोलीस जिमखाना संघासमोर आता अंतिम फेरीत युनियन बँक ऑफ इंडिया संघाचे आव्हान असेल. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात युनियन बँक ऑफ इंडियाने चौगुले स्पोर्ट्स क्लबवर १३ धावांनी मात केली.

 

संक्षिप्त धावफलक:

न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स एससी - 16.3 षटकांत सर्वबाद 73 (संस्कार दहेलकर 36, शौरी नगर 14, अनिश शेट्टी 11; हशिम सय्यद 18-3, निशित भल्ला 8-2, महादेव कदम 22-2) वि. मुंबई पोलीस जिमखाना - 7.1 षटकांत बिनबाद 77 (जयेश चंदनकर नाबाद 41, तन्मय मयेकर नाबाद 34).


निकाल - मुंबई पोलीस जिमखाना 10 विकेट राखून विजयी.

 

युनियन बँक ऑफ इंडिया - 20 षटकांत 3 बाद 157 (रूप यादव 68; रोहित यादव 6-3) वि. चौगुले स्पोर्ट्स क्लब - 20 षटकांत 7 बाद 144 (जितेश राऊत 31, सोहम माळी 31; गौरव भंवर 29-3, तनय खान्देशी 19-2).


निकाल - युनियन बँक ऑफ इंडिया 13 धावांनी विजयी.

 

 


Post a Comment

0 Comments