राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या किशोर गटाचा
दमदार प्रवास!
हिमाचल प्रदेशवर दणदणीत विजय;
उपांत्यपूर्व फेरीत
धडक
मुंबई : गया, बिहार येथे सुरू असलेल्या ३४व्या किशोर/किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत
महाराष्ट्राच्या किशोर गटाने आपल्या जबरदस्त खेळाने
उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. उपउपांत्यपूर्व फेरीत त्यांनी
हिमाचल प्रदेशचा ४७-२८ असा धुव्वा
उडवत शानदार विजय मिळवला.
मॅटवर रंगलेल्या या सामन्यात महाराष्ट्राच्या संघाने
पहिल्यापासून आक्रमक खेळ दाखवत पूर्वार्धातच दोन लोण देत ३२-११ अशी भक्कम आघाडी घेतली.
मात्र, उत्तरार्धात हिमाचल प्रदेशनेही जोरदार पुनरागमन करत लोण देत
आघाडी कमी केली. पण शेवटच्या काही मिनिटांत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पुन्हा एक
लोण देत विजयावर शिक्कामोर्तब केले.
महाराष्ट्राच्या विजयात चमकदार खेळ
तुकाराम दिवटे, आर्यन पवार, किशोर जगताप, मनीष काळजे आणि सारंग उंडे यांनी प्रभावी चढाया आणि अचूक पकडी करत विजयाचा पाया रचला.
उत्तरार्धात हिमाचल प्रदेशने भक्कम पुनरागमन केले असले,
तरी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी शेवटच्या काही क्षणांत संयम
राखत सामन्यावर पकड कायम ठेवली.
या दणदणीत विजयासह महाराष्ट्राच्या संघाने
उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान
पक्के केले असून, आता पुढील लढतीसाठी संघ सज्ज आहे.
Post a Comment
0 Comments