राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत सिद्धांत वाडवलकर आणि
प्राजक्ता नारायणकर उपांत्य फेरीत
मुंबई: प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, विले पार्ले येथे सुरू असलेल्या उत्कर्ष
स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती,
जुहू यांच्या सहकार्याने रोटरी क्लब ऑफ पार्लेश्वर मुंबई आयोजित ५
व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष व महिला गटातील
उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
पुरुष एकेरी गटाच्या उपउपांत्य फेरीत मुंबईच्या सिद्धांत
वाडवलकरने प्रभावी खेळ करत मुंबईच्या निलांश चिपळूणकरला सहज पराभूत करत
उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. तसेच, महिला एकेरी गटात मुंबई उपनगरच्या प्राजक्ता नारायणकरने ठाण्याच्या
चैताली सुवारेला रोमांचक लढतीत पराभूत करत उपांत्य फेरी गाठली.
पुरुष एकेरी उपउपांत्य फेरी निकाल:
प्रशांत मोरे (मुंबई) वि. मोहम्मद घुफ्रान (मुंबई)
अभिजित त्रिपणकर (पुणे) वि. संजय मांडे (मुंबई)
पंकज पवार (ठाणे) वि. ओमकार टिळक (मुंबई)
महिला एकेरी उपउपांत्य फेरी निकाल:
समृद्धी घाडीगावकर (ठाणे) वि. अंबिका हरिथ (मुंबई)
आकांक्षा कदम (रत्नागिरी) वि. श्रुती
सोनावणे (पालघर)
काजल कुमारी (मुंबई) वि. अंजली सिरीपुरम (मुंबई)
Post a Comment
0 Comments