Type Here to Get Search Results !

कोल्हापूरमध्ये राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे भव्य आयोजन

 


कोल्हापूरमध्ये राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे भव्य आयोजन

 

मुंबई, दि. २५ मार्चछत्रपती शंभूराजे फ्रेंड्स सर्कलच्यावतीने राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, ही स्पर्धा १२ ते १४ एप्रिल २०२५ दरम्यान गंगा भाग्योदय सांस्कृतिक हॉल, मेन रोड, कसबा बावडा, कोल्हापूर येथे पार पडणार आहे.

 

महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कोल्हापूर डिस्ट्रिक्ट अमेच्युअर कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पुरुष एकेरी व महिला एकेरी असे दोन गट ठेवण्यात आले आहेत. या स्पर्धेत विजेतेपद मिळवणाऱ्या खेळाडूंना एकूण १ लाख १० हजार रुपयांची भव्य रोख पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.

 

स्पर्धेचे अर्ज व नाव नोंदणी:

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंसाठी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रवेश अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. २६ मार्च २०२५ ही अर्ज भरून पाठविण्याची अंतिम तारीख असून, इच्छुक खेळाडूंनी आपापल्या जिल्हा कॅरम संघटनेशी त्वरित संपर्क साधावा.


Post a Comment

0 Comments