गुड मॉर्निंग स्पोर्ट्सचा दमदार विजय,
"रामसिंग चषक"
पटकावला!
मुंबई : प्रभादेवी येथील राजाराम साळवी क्रीडांगणावर झालेल्या
रामसिंग चषकाच्या अंतिम सामन्यात
गुड मॉर्निंग स्पोर्ट्सने शानदार कामगिरी करत अंकुर स्पोर्ट्सचा पराभव केला आणि
रोख ₹११,०००/- आणि प्रतिष्ठेचा चषक आपल्या नावे केला.
गुड मॉर्निंगच्या विजयात शार्दुल पाटीलने महत्त्वाची भूमिका
बजावली आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून एलईडी टीव्हीने गौरवला गेला.
उपविजेत्या अंकुर स्पोर्ट्सला ₹९,०००/- रोख रक्कम आणि चषकावर समाधान मानावे लागले.
गुड मॉर्निंगची झंझावाती सुरुवात
गुड मॉर्निंग स्पोर्ट्सने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत
पहिल्या सत्रात २ लोण देत २२-११ अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात संघाने खेळ अधिक सावध करत आघाडी राखण्यावर भर
दिला आणि अखेर विजयावर शिक्कामोर्तब केले.
शार्दुल पाटील आणि साहिल राणे यांच्या आक्रमक चढायांना
सर्वेश पांचाळच्या भक्कम बचावाने
मोलाची साथ दिली.
अंकुरचा अखेरच्या क्षणी संघर्ष
अंकुर स्पोर्ट्सच्या सुशांत साईल, अभि भोसले आणि प्रयाग दळवी यांनी उत्तरार्धात खेळ गतिमान
करत एक लोण परत फेडत संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सामना रंगतदार झाला, पण विजयाच्या उंबरठ्यावर ते अपयशी ठरले.
उपांत्य फेरीतील रोमांचक सामने
गुड मॉर्निंग स्पोर्ट्सने उपांत्य फेरीत विजय नवनाथचा,
तर अंकुर स्पोर्ट्सने सिद्धीप्रभा फाउंडेशनचा पराभव करत
अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता.
विशेष पुरस्कार विजेते
- सर्वोत्तम चढाई खेळाडू : सुशांत साईल (अंकुर स्पोर्ट्स)
- सर्वोत्तम पकडीचा खेळाडू : साहिल राणे (गुड मॉर्निंग स्पोर्ट्स)
दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी हूपर देऊन गौरवण्यात आले.
विकास क्रीडा मंडळाच्या उत्कृष्ट आयोजनामुळे
रामसिंग चषक स्पर्धा अत्यंत यशस्वी
ठरली आणि प्रेक्षकांना एक अत्यंत चुरशीचा सामना पाहायला मिळाला.
Post a Comment
0 Comments