Type Here to Get Search Results !

आमदार सचिनभाऊ चषक राज्य स्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत प्रसन्न गोळे विजेता

 


आमदार सचिनभाऊ चषक राज्य स्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत प्रसन्न गोळे विजेता


मुंबई: आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या सहकार्याने आयोजित आमदार सचिनभाऊ अहिर चषक राज्य स्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत पोद्दार अकॅडमी-मालाड स्कूलचा उदयोन्मुख खेळाडू प्रसन्न गोळे याने शानदार कामगिरी करत अजिंक्यपद मिळवले.


प्रसन्नने खेळाची जिद्द दाखवत अंतिम फेरीत पिछाडीवरून विजय मिळवला. निर्णायक बोर्डपर्यंत ९-० अशी आघाडी असतानाही पुष्कर गोळे याला विजय साकारता आला नाही. प्रसन्नने आत्मविश्वासाने खेळ करत अचूक फटकेबाजीच्या जोरावर १३-९ असा विजय मिळवला आणि विजेतेपदावर नाव कोरले. तर दमदार सुरुवात करूनही पुष्करला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.


विजेत्यांचा सन्मान आणि पारितोषिक वितरण

स्पर्धेच्या बक्षीस समारंभात संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या आणि उपविजेत्यांना आकर्षक चषक, स्ट्रायकर, सिद्धीविनायक प्रसाद आणि विशेष भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.


स्पर्धेतील ठळक निकाल:

उपांत्य फेरी:


पुष्कर गोळे (९-७) आर्यन राऊत (न्यू इंग्लिश स्कूल, जैतापूर)


प्रसन्न गोळे (९-१) सोहम जाधव (शारदाश्रम विद्यामंदिर, दादर)



*उपविजेते:*


आर्यन राऊत आणि सोहम जाधव (उपांत्य उपविजेते)



*उपांत्यपूर्व उपविजेते:*


निधी सावंत, अद्वैत पालांडे (पाटकर विद्यालय, डोंबिवली)


सार्थक केरकर (पार्ले टिळक विद्यालय)


समीर कांबळे (एसव्हीएस इंग्लिश स्कूल)



*उपउपांत्यपूर्व उपविजेते:*


अमेय जंगम, गौरांग मांजरेकर, शिवांश मोरे, प्रेक्षा जैन, वेदांत पाटणकर, तीर्थ ठक्कर, साईराज साखरकर, उमैर पठाण



राज्यभरातील खेळाडूंचा सहभाग आणि पुढील संधी


या स्पर्धेत मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, जैतापूर या जिल्ह्यांतील ४० हून अधिक शालेय सबज्युनियर कॅरमपटूंनी सहभाग घेतला होता. यामधून उत्कृष्ट खेळाडूंना संधी देण्यासाठी १ मे रोजी आयोजित मोफत शालेय सुपर लीग कॅरम स्पर्धेत पहिल्या ४ विजेत्यांना थेट प्रवेश देण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments