Type Here to Get Search Results !

अनाहत, जोशना, आकांक्षा, वीर यांचा जेएसडब्लू इंडियन ओपन स्क्वॉश स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश

 


अनाहत, जोशना, आकांक्षा, वीर यांचा जेएसडब्लू इंडियन ओपन स्क्वॉश स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश

 

मुंबई,: बॉम्बे जिमखाना येथे सुरू असलेल्या जेएसडब्लू इंडियन ओपन स्क्वॉश स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करत तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला. महिलांमध्ये अनाहत सिंग, जोशना चिनप्पा आणि आकांक्षा साळुंके यांनी शानदार विजय मिळवले, तर पुरुष गटात वीर चोत्रानीने खळबळजनक निकालाची नोंद केली. मात्र, भारताचा अव्वल मानांकित रमित टंडन याला दुसऱ्या फेरीतच पराभवाचा धक्का बसला.

 

महिला गटातील उत्तुंग कामगिरी

भारताच्या १७ वर्षीय अनाहत सिंगने स्पेनच्या क्रिस्टीना गोमेजवर ११-०५, ०९-११, ११-०५, ११-०२ असा सहज विजय मिळवून तिसरी फेरी गाठली. पाचव्या मानांकित जोशना चिनप्पाने उत्कृष्ट नियंत्रण आणि अचूकतेचे दर्शन घडवताना स्पेनच्या सोफिया मॅतेओसचा ११-०१, ११-०७, ११-०८ असा केवळ २० मिनिटांत धुव्वा उडवला.

आकांक्षा साळुंकेने भारताच्या तन्वी खन्नाचा कडवा प्रतिकार करत पहिली गेम गमावल्यानंतर ०६-११, ११-०८, ११-०७, ११-०४ असा विजय मिळवला. हा सामना ३९ मिनिटे चालला.

 


पुरुष गटातील आश्वासक प्रदर्शन

पुरुष गटात वीर चोत्रानीने पाचव्या मानांकित सिमोन हार्बर्टवर ११-०४, १०-१२, १६-१४, ११-०६ असा विजय मिळवत खळबळजनक निकालाची नोंद केली. सहाव्या मानांकित भारताच्या अभय सिंगने फ्रान्सच्या मेवविल सायनीमॅनिकोवर ११-०५, ११-०७, ११-०८ असा सहज विजय मिळवला.

 


मात्र, भारताचा अव्वल मानांकित रमित टंडन याला मलेशियाच्या आमीशेन राज चंद्रनविरुद्ध ५२ मिनिटांच्या चुरशीच्या लढतीनंतर ०५-११, ०१-११, ११-०६, ११-०४, ११-०६ असा पराभव स्वीकारावा लागला. तसेच, भारताच्या वेलावन सेंथिलकुमारने जोरदार झुंज दिल्यानंतरही इजिप्तच्या करीम एल टोर्कीविरुद्ध ०७-११, ०३-११, ०५-११ असा पराभव पत्करला.

 


इतर महत्त्वाचे निकाल:

[८] स्पेन्सर लव्हजॉय (अमेरिका) वि. ब्राईस निकोलस (फ्रान्स) ३-१ (११-९, ८-११, १२-१०, ११-३) (५८ मिनिटे)

 

[४] उमर मोसाद (इजिप्त) वि. दिएगो गोबी (ब्राझील) ३-० (११-८, ११-८, १४-१२) (३८ मिनिटे)

 

नादियान इल्हामामी (इजिप्त) वि. [७] वाई यान औ येओंग (सिंगापूर) ३-० (११-४, ११-५, ११-४) (२७ मिनिटे)

 

[४] चिंग हे फंग (हाँगकाँग) वि. सलमा एल अल्फी (इजिप्त) ३-० (११-५, ११-६, ११-८) (२७ मिनिटे)

 

[८] बार्ब समेह (इजिप्त) वि. मलाक फाथी (इजिप्त) ३-० (१३-११, ११-८, ११-९) (३७ मिनिटे)

 

[७] मुस्तफा एल्सर्टी (इजिप्त) वि. मॅटियास नुडसेन (कोलंबिया) ३-१ (१-११, १४-१२, ११-६, ११-४) (४९ मिनिटे)

 

[३] करीम अल हम्मामी (इजिप्त) वि. झियाद इब्राहिम (इजिप्त) ३-० (११-४, ११-४, ११-६) (३० मिनिटे)

 

हेलन टँग (हाँगकाँग) वि. [६] जॅकलिन पेचर (ऑस्ट्रिया) ३-२ (९-११, १२-१०, ११-८, ९-११, १२-१०) (५२ मिनिटे)

 

[२] हबीबा हानी (इजिप्त) वि. नूर रामी (इजिप्त) ३-० (११-६, ११-९, ११-८) (२८ मिनिटे)

 


Post a Comment

0 Comments