Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र ओपन चॅलेंजर्स कॅरम स्पर्धा माजी विश्वविजेते प्रशांत आणि योगेशला पराभवाचा धक्का

 



महाराष्ट्र ओपन चॅलेंजर्स कॅरम स्पर्धा

माजी विश्वविजेते प्रशांत आणि योगेशला पराभवाचा धक्का

 

मुंबई: महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ पुरस्कृत दुसऱ्या महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत मोठे अनपेक्षित निकाल पाहायला मिळाले. महाराष्ट्राच्या सुपेश कामतेकरने महाराष्ट्राचे माजी विश्वविजेते प्रशांत मोरे यांच्यावर चुरशीच्या लढतीत विजय मिळवत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. दुसरीकडे, मध्य प्रदेशच्या महम्मद साजिदने महाराष्ट्राचे आणखी एक माजी विश्वविजेते योगेश परदेशी यांच्यावर खळबळजनक विजय मिळवून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.

 

स्पर्धा एकाच वेळी २४ सिस्का कॅरम बोर्डांवर खेळवली जात असून, एकूण १० लाख रुपयांची बक्षिसे असलेल्या या स्पर्धेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मालदीव, श्रीलंका आणि अमेरिकेच्या खेळाडूंच्या सहभागामुळे स्पर्धेचा उत्साह अधिक वाढला आहे.

 

पुरुष एकेरी गट तिसऱ्या फेरीचे निकाल:

संदीप सावंत (महाराष्ट्र) वि. सलमान खान (महाराष्ट्र): विजय - संदीप सावंत

अभिषेक भारंबे (महाराष्ट्र) वि. तुलसीदास हळर्णेकर (गोवा): विजय - अभिषेक भारंबे

जलालुद्दीन मुल्ला (महाराष्ट्र) वि. नवीन चीकलापुडी (अमेरिका): विजय - जलालुद्दीन मुल्ला

संतोष डोखे (महाराष्ट्र) वि. सचिन बांदल (महाराष्ट्र): विजय - संतोष डोखे

राजेश गोहिल (महाराष्ट्र) वि. एस. ए. इकबाल (मध्य प्रदेश): विजय - राजेश गोहिल

संजय मणियार (महाराष्ट्र) वि. यमान जलील (मालदीव): विजय - संजय मणियार

जुगल किशोर दत्ता (आसाम) वि. प्रफुल रसाळ (महाराष्ट्र): विजय - जुगल किशोर दत्ता

एस. के. महम्मद (तेलंगणा) वि. प्रकाश दुधाळे (महाराष्ट्र): विजय - एस. के. महम्मद

हारून शेख (महाराष्ट्र) वि. गिहन चमारा (श्रीलंका): विजय - हारून शेख

महम्मद अहमद (तेलंगणा) वि. शरद मोरे (महाराष्ट्र): विजय - महम्मद अहमद

अनिल मुंढे (महाराष्ट्र) वि. तैमूर अश्रफ (दिल्ली): विजय - अनिल मुंढे

 

स्पर्धेतील रंगत वाढत चालली असून, तिसऱ्या फेरीतील रोमांचक सामने प्रेक्षकांना थरारक अनुभव देत आहेत. स्पर्धेतील महत्वाचे सामने महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह पाहता येणार आहेत.


Post a Comment

0 Comments