79वी सीसीआय वेस्टर्न इंडिया स्लॅम स्क्वॉश
स्पर्धा
मिथुन, नैतिकची आगेकूच
मुंबई, 17 डिसेंबर: क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या (सीसीआय) स्क्वॉश कोर्टवर सुरू
झालेल्या 79व्या सीसीआय वेस्टर्न इंडिया स्लॅम स्क्वॉश
स्पर्धेत 17 वर्षांखालील मुले गटात मिथुन दरवडा आणि नैतिक
चांदने आपली आगेकूच कायम राखली आहे.
मंगळवारी झालेल्या राउंड ऑफ 32 फेरीत मिथुन दरवडाने अर्जुन रामचंद्रन याला 11-6,
11-5, 11-2 अशा सरळ सेटमध्ये मात दिली. दुसऱ्या एका चुरशीच्या
सामन्यात नैतिक चांदने पिछाडीवरून पुनरागमन करत आरव शाहवर 14-16, 11-5,
11-9, 11-5 असा विजय मिळवला.
अब्दुस समद शाह, रमेश शिंगवा, पार्थवीर सिंग, युवराज
ओडेंड्रा, राघव कालरा आणि अर्जुन मोरे यांनीही आपल्या
विजयासह पुढील फेरीत स्थान निश्चित केले आहे.
निकाल (17 वर्षांखालील मुले):
पार्थवीर शाह (5/8) विजयी वि. नील शाह 11-2, 11-4, 11-1
युवराज ओडेंड्रा पुढे चाल वि. गुरकीरत सिंग
राघव कालरा (3/4) विजयी वि. आर्यन पी. 11-4, 12-10,
11-4
अर्जुन मोरे (3/4) विजयी वि. देवांश पारीक 11-1, 11-1,
11-1
रमेश शिंगवा (9/16) विजयी वि. ध्रुव मेहता 11-7, 11-3,
11-7
अब्दुस शाह (2) विजयी वि. कमलेश दोरे 11-4, 11-8,
11-5
Post a Comment
0 Comments