एमसीए प्रेसिडेंट कप सी आणि डी डिव्हिजन स्पर्धा
घाटकोपर जॉली जिमखाना उपांत्य फेरीत प्रवेश
मुंबई, 24 नोव्हेंबर – घाटकोपर जॉली जिमखाना संघाने सुपरस्टार एससीवर 6
विकेट राखून शानदार विजय मिळवत एमसीए प्रेसिडेंट कप सी आणि
डी डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.
क्रॉस मैदानावरील एम. बी. युनियन मैदानावर झालेल्या
उपांत्यपूर्व सामन्यात घाटकोपर जॉली जिमखान्याच्या गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी
केली. वेदांश पटेलने 3 बळी घेतले, तर
देवांग गोसालिया आणि राजेश सोनी यांनी प्रत्येकी 2 बळी घेत सुपरस्टार एससीला 20 षटकांत 8 बाद 97 धावांवर रोखले. सुपरस्टारकडून संग्राम रणवरेने खालच्या फळीत
38
धावांची खेळी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
घाटकोपर जॉली जिमखान्याने 98 धावांचे माफक आव्हान 15.2 षटकांत 4 विकेट गमावत सहज पार केले. सलामीवीर शिवम कुमारने 30
धावा केल्या, तर जय संगानीने नाबाद 20 धावा करत संघाला विजयाकडे नेले.
इतर सामने:
डॅशिंग एससीने वरळी सीसीवर 85 धावांनी विजय मिळवला. डॅशिंगकडून निहिल किणीने नाबाद 46
धावांची खेळी केली. गोलंदाजीत सौरभ तिवारीने 3/8
अशी शानदार कामगिरी केली.
तिसऱ्या सामन्यात नवी मुंबई एसएने केआरपी इलेव्हन क्रिकेट
क्लबला 91
धावांनी पराभूत केले. सिद्धांत दोशीने 57
धावांचे योगदान दिले, तर अहमद शेखने 5/20 अशी आक्रमक गोलंदाजी करत प्रतिस्पर्ध्यांचा डाव उध्वस्त
केला.
संक्षिप्त धावफलक:
- सुपरस्टार
एससी: 20 षटकांत 8 बाद 97 (संग्राम रणवरे 38; वेदांश पटेल 3/12)
घाटकोपर जॉली जिमखाना: 15.2 षटकांत 4 बाद 101 (शिवम कुमार 30).
निकाल: घाटकोपर जॉली जिमखाना 6 विकेट्सने विजयी.
- डॅशिंग
एससी: 18 षटकांत 7 बाद 128 (निहिल किणी 46*, मनोज यादव 37; प्रतीक म्हात्रे 3/28)
वरळी सीसी: 12.1 षटकांत सर्वबाद 43 (सौरभ तिवारी 3/8, तनिश सावे 2/7, निश्चय अरोरा 2/7). निकाल: डॅशिंग एससी 85 धावांनी विजयी.
- नवी मुंबई
एसए: 20 षटकांत 9 बाद 144 (सिद्धांत दोशी 57, बाळकृष्ण काशीद 28; हमजा शेख 2/40), केआरपी इलेव्हन क्रिकेट क्लब:
12.1 षटकांत सर्वबाद 53
(अहमद शेख 5/20,
हिमांशू चौधरी 4/19). निकाल: नवी मुंबई एसए 91 धावांनी विजयी.
Post a Comment
0 Comments