Type Here to Get Search Results !

सरस्वती मंदिर हायस्कूलसच्या अमृत मोहत्सवी वर्षानिमित्त आंतरशालेय लंगडी स्पर्धा मुलांमध्ये सरस्वती मंदिर हायस्कूल विरुध्द श्री गणेश विद्यालय अंतिम फेरीत लढणार

 


सरस्वती मंदिर हायस्कूलसच्या अमृत मोहत्सवी वर्षानिमित्त आंतरशालेय लंगडी स्पर्धा

मुलांमध्ये सरस्वती मंदिर हायस्कूल विरुध्द श्री गणेश विद्यालय अंतिम फेरीत लढणार

 

सरस्वती मंदिर हायस्कूलसच्या अमृत मोहत्सवी वर्षानिमित्त आंतरशालेय लंगडी व खो-खो स्पर्धांचे आयोजन केले आहे. दुसऱ्या दिवशी मुलांचे सामने झाले. स्पर्धेतील दोन्ही उपांत्यफेरीत उत्कंठावर्धक लढती पाहायला मिळाल्या. या सामन्यांमधून  सरस्वती मंदिर हायस्कूल आणि श्री गणेश विद्यालय यांनी आपापले सामने जिंकून अंतिम फेरीत स्थान मिळवले.

यावेळी भूषण मर्दे, संजय सुकटनकर, डॉ. आशिष मुळगावकर, सुधाकर राऊळ, मुख्याध्यापक चाबुकस्वार, उपमुख्याध्यापिका सौ. बिनसाळे इ. संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.  

 


पहिला उपांत्य फेरी सामना:

पहिल्या सामन्यात सरस्वती मंदिर हायस्कूलने अहिल्या विद्या मंदिरचा ३०-११ असा एक डाव व १९ गुणांनी पराभव केला.

सरस्वती कडून प्रभावी खेळ:

या सामन्यात सरस्वतीकडून हर्ष प्रजापती (१ मिनिटे संरक्षण व आक्रमणात ४ गडी), शिवम झा (आक्रमणात ४ गडी) व श्रेयस जावळे (आक्रमणात ३ गुण) यांनी केलेल्या खेळामुळे सरस्वती मंदिर हायस्कूलचा संघ अंतिम सामन्यात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला. तर पराभूत अहिल्या विद्या मंदिरच्या विश्वेश गुलगुले (आक्रमणात ५ गुण), मुझम्मील शाह (आक्रमणात ३ गुण) यांनी केलेली खेळी त्यांना पराभवापासून वाचवू शकली नाही. 

 


दुसरा उपांत्य फेरी सामना:

दुसऱ्या सामन्यात श्री गणेश विद्यालयाने  वाडीबंदर मुंबई पब्लिक स्कूलचा ३३-२२ असा एक डाव व ११ गुणांनी पराभव केला.

श्री गणेश कडून उत्कृष्ट खेळ:

या सामन्यात श्री गणेश विद्यालयाच्या मानस पोस्टरे (२:३० मिनिटे संरक्षण व आक्रमणात १ गुण), संयम धाडवे (आक्रमणात ७ गुण), अमेय मोहिते (आक्रमणात ६ गुण) यांनी विजयात मोठी कामगिरी करत श्री गणेश विद्यालयाला अंतिम फेरीत स्थान मिळवून दिले तर पराभूत वाडीबंदर मुंबई पब्लिक स्कूलच्या प्रविण गुप्ता (आक्रमणात ३ गुण), ऋषी ठाकूर (आक्रमणात २ गुण) यांनी चांगला खेळ केला पण त्यांना इतरांची साथ लाभली नाही त्यामुळे त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.   


Post a Comment

0 Comments