Type Here to Get Search Results !

एमसीए प्रेसिडेंट चषक क्रिकेट स्पर्धा फायनलमध्ये एमआयजी क्रिकेट क्लब वि कर्नाटक एसएशी अंतिम फेरीत लढणार

 


एमसीए प्रेसिडेंट चषक क्रिकेट स्पर्धा

फायनलमध्ये एमआयजी क्रिकेट क्लब वि कर्नाटक एसएशी अंतिम फेरीत लढणार

 

मुंबई, : एमआयजी क्रिकेट क्लबने व्हिक्ट्री क्रिकेट क्लबवर 8 विकेट राखून विजय मिळवत एमसीए प्रेसिडेंट चषक क्रिकेट स्पर्धेच्या ए आणि बी डिव्हिजनच्या अंतिम फेरीत धडक मारली. 56 चेंडूत 96 धावांची तडाखेबंद खेळी करणारा सलामीवीर वरुण लवंदेची आक्रमक आणि प्रभावी खेळी प्रेक्षणीय ठरली.  वरुण लवंदे एमआयजीच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

 

कांदिवली येथील सचिन रमेश तेंडुलकर मैदान 1 वर झालेल्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात एमआयजी क्रिकेट क्लबने 175 धावांचे विजयी लक्ष्य 17.3 षटकांत 2 विकेट्सच्या बदल्यात पार केले. सलामीवीर वरुण लवंदेने 56 चेंडूत 96 धावांची खेळी करत, 7 चौकार आणि तितक्याच षटकारांची आतषबाजी केली. त्याच्या या जोरदार फटकेबाजीमुळे एमआयजीला विजय मिळवता आला. त्याला वनडाऊन विशांत मोरेने (37 चेंडूंत नाबाद 59 धावा) चांगली साथ दिली. यापूर्वी, कर्णधार सलामीवीर जय बिस्ताच्या (48 चेंडूंत 67 धावा) अर्धशतकाच्या जोरावर व्हिक्ट्री सीसीने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 174 धावांची मजल मारली.

 

दुसऱ्या उपांत्य सामन्यात कर्नाटक स्पोर्टिंग असोसिएशनने (केएसए) नॅशनल क्रिकेट क्लबवर 31 धावांनी मात केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना केएसएने 20 षटकांत 5 बाद 205 अशी मोठी धावसंख्या उभारली. यामध्ये चौथ्या क्रमांकावरील गौरीश जाधवच्या 49 चेंडूत 91 धावांच्या तडाखेबंद खेळीचा समावेश होता. त्याने 6 चौकार आणि 7 षटकारांची आतषबाजी केली. गौरीश शतकाच्या जवळपास पोहोचला, पण त्याला शतकाला मुकावे लागले. वनडाऊन अजिंक्य पाटीलने (51 धावा) त्याला उत्तम साथ दिली. अजिंक्यने 37 चेंडूंत 2 चौकार आणि 4 षटकार ठोकले.

 

प्रत्युत्तरादाखल, नॅशनल क्रिकेट क्लबला 20 षटकांत 8 बाद 176 धावांचीच मजल मारता आली. त्यांच्याकडून वनडाऊन राहुल कोडावूर (54) आणि तळातील भूषण तळवडेकरने (41) थोडा प्रतिकार केला. राकेश प्रभूने 3 आणि भव्या अत्रेने 2 विकेट घेत कर्नाटक एसएच्या विजयास हातभार लावला.

 

संक्षिप्त धावफलक:
कर्नाटक एसए - 20 षटकांत 5 बाद 207 (गौरीश जाधव 91 (49 चेंडू, 6 चौकार, 7 षटकार), अजिंक्य पाटील 51 (37 चेंडू, 2 चौकार, 4 षटकार))


विरोधात नॅशनल क्रिकेट क्लब - 20 षटकांत 8 बाद 176 (राहुल कोडावूर 54, भूषण तळवडेकर 41)

दोन्ही टीम्स आता एमसीए प्रेसिडेंट चषकाच्या अंतिम फेरीत एकमेकांसमोर उभ्या राहतील.

 


Post a Comment

0 Comments