खार जिमखान्याच्या अध्यक्षपदी गौरव कपाडिया यांची निवड
मुंबई: खार जिमखान्याच्या अध्यक्षपदी गौरव कपाडिया यांची २०२४-२६ या
कालावधीसाठी निवड झाली आहे. कार्यकारी समिती आणि व्यवस्थापकीय समितीच्या नुकत्याच
झालेल्या निवडणुकीत गौरव कपाडिया यांनी दोन वेळचे माजी अध्यक्ष श्याम श्रॉफ यांचा
३५० पेक्षा जास्त मतांच्या फरकाने पराभव केला. गौरव कपाडिया यांना जिमखान्याचे
बहुतांश सदस्यांनी आपला पाठिंबा दिला.
गौरव कपाडिया आणि त्यांच्या टीमला व्यवस्थापकीय समितीच्या निवडणुकीत विशेष यश
मिळाले आहे. त्यांच्या पॅनलने १२ पैकी १० जागांवर विजय मिळवून आपले वर्चस्व सिद्ध
केले.
नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून गौरव कपाडिया खार जिमखान्यात प्रगतीशील परिवर्तन
घडवण्यासाठी तयार आहेत. क्रीडा आणि मनोरंजनाच्या सुविधांचा विस्तार करणे हे
त्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तसेच, त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह एक मजबूत, समावेशक
आणि एकसंध समुदाय निर्माण करण्याची योजना केली आहे. कपाडिया यांचा हा निर्णायक
विजय खार जिमखान्यासाठी एका नवीन युगाची सुरूवात ठरणार आहे.
निवडून आलेले कार्यकारिणी सदस्य: गौतम चांदे, संजय बचानी, जान्हवी गुरनानी, अजय
बबला, कुमार निचानी, संजय देवनानी,
किरणे भट्ट, साहेब सिंह लांबा, विकास केरकर, आशर मढवी, ध्रुव
कोहली, कुणाल सोळंकी.
Post a Comment
0 Comments