ठाण्याचा अनुज अग्रवालचा मुंबईच्या राहुल सचदेववर विजय
मलबार हिल क्लब राज्य मानांकन स्नूकर स्पर्धा
मुंबई, 18 नोव्हेंबर:
ठाण्याचा क्यूईस्ट खेळाडू अनुज अग्रवालने सातत्य राखत मलबार हिल क्लब राज्य
मानांकन स्नूकर स्पर्धेच्या मुख्य ड्रॉमधील पहिल्या फेरीत मुंबईच्या राहुल सचदेववर
4-2 असा विजय प्राप्त केला.
एमएचसी बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत सोमवारी अग्रवालने 0-1 अशा पिछाडीवरून खेळ उंचावत तीन सलग फ्रेम्स
जिंकल्या. त्याने 31 (तिसरी फ्रेम), 32 (चौथी फ्रेम) आणि 40 (पाचवी फ्रेम) अशा उत्कृष्ट
ब्रेक्ससह 61-62, 53-49, 62-22, 58-10, 57-50, 62-57 अशी
बाजी मारली. सचदेवने पहिल्या फ्रेममध्ये 32 गुणांचा ब्रेक
घेत जिंकली, पण त्याला त्यानंतर सातत्य राखता आले नाही.
त्याने सहावी फ्रेम जिंकली, मात्र तोवर सामना त्याच्या हाती
निसटला होता.
वाशीच्या गौरव जयसिंघानीने पुण्याच्या युवा खेळाडू आरव संचेतीला 4-1 (53-60, 55-49, 45-36, 58-30, 54-12) असे
पराभूत केले.
मुंबईच्या सुमेर मागोनेही आपला पहिला फेरीचा सामना जिंकताना प्रतिभाशाली
आदित्य शांडिल्यला 4-2 (71-9, 55-11,
43-56, 72-20, 49-72, 64-21) असा पराभव केला.
निकाल (15-रेड मेन ड्रॉ -
पहिली फेरी):
- सुमेर मागो
(मुंबई) विजयी वि. आदित्य शांडिल्य (मुंबई) 4-2 (71-9, 55-11, 43-56, 72-20, 49-72, 64-21)
- अनुज
अग्रवाल (ठाणे) विजयी वि. राहुल सचदेव (मुंबई) 4-2 (61-62, 53-49, 62-22, 58-10, 57-50, 62-57)
- गौरव
जयसिंघानी (वाशी) विजयी वि. आरव संचेती (पुणे) 4-1 (53-60, 55-49, 45-36, 58-30, 54-12)
फोटो: ठाण्यातील क्यूईस्ट खेळाडू अनुज अग्रवालने मुंबईच्या राहुल सचदेवला 4-2 अशा फरकाने हरवले.
Post a Comment
0 Comments