ओम, मनस्वीला कास्य पदके
मुंबई. ...क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद अहिल्यानगर, अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ व त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय १७ वर्षा खालील मुला व मुलींच्या कुस्ती स्पर्धेत ओम जाधव, मनस्वी राऊतने कास्य पदकांची कमाई केली.
हे दोघे कुस्तीपटू मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने व मिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा भाईंदर च्या आखाडय़ात सराव करतात.ब्लॉसम कॉलेजात शिकत असलेल्या सुनील जाधवने ९२ किलो वजनी गटात कास्य तर
न्यू रॉयल स्कूलमध्ये शिकत असलेल्या मनस्वी राऊतने ६१ किलो वजनी गटात तिसरा क्रमांक मिळवला. या दोघांना वस्ताद वसंतराव पाटील यांचे प्रशिक्षण मिळत आहे.
या स्पर्धा - श्री दादासाहेब हरिभाऊ घाडगे पाटील माध्य. व उच्च माध्य. विद्यालय ,मुकिंदपुर, ता. नेवासा, जि.अहिल्यानगर या ठिकाणी संपन्न झाल्या.
Post a Comment
0 Comments