कॅथलिक जिमखाना फुटबॉल निवडचाचणी शनिवार आणि रविवारी
मुंबई, 7 नोव्हेंबर: मुंबई फुटबॉल असोसिएशनच्या (एमएफए) दुसऱ्या डिव्हिजनचा विजेता
आणि फर्स्ट डिव्हिजनसाठी पात्र ठरलेल्या कॅथलिक जिमखान्यातर्फे 2024-2025 हंगामासाठी फुटबॉल निवडचाचणी घेतली जाणार आहे.
निवड चाचणीच्या पहिल्या दिवशी म्हणजे शनिवार (9 नोव्हेंबर) रोजी कर्नाटक एसए मैदान,
क्रॉस मैदान (चर्चगेट एंड) येथे दुपारी 4:30 वाजता
सिलेक्षण होईल. दुसरी चाचणी रविवारी (10 नोव्हेंबर) गोआन्स
एसए मैदान, क्रॉस मैदान येथे सकाळी 8:30 वाजता होईल.
कॅथलिक जिमखाना संघाचे प्रतिनिधित्व करण्यास इच्छुक
असलेल्या खेळाडूंना प्ले किटसह ट्रायल्ससाठी उपस्थित राहावे लागेल, तसे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुक खेळाडूंनी
कृपया नियोजित वेळेच्या किमान 20 मिनिटे आधी कार्यक्रमस्थळी
पोहोचावे.
अधिक माहितीसाठी खालील व्यक्तींशी संपर्क साधावा :
प्रशिक्षक रॉय फर्नांडिस – ९८२०० ००४९९, गॉर्डन डी’कोस्टा –
९८२०८०२५२४
Post a Comment
0 Comments