Type Here to Get Search Results !

जेव्हीपीजी-टीएसटीटीए टेबलटेनिस स्पर्धा रीगन, शर्वेय, मुक्ता, अनन्या अंतिम फेरीत

 


जेव्हीपीजी-टीएसटीटीए टेबलटेनिस स्पर्धा  

रीगन, शर्वेय, मुक्ता, अनन्या अंतिम फेरीत

 

मुंबई, 8 नोव्हेंबर: सबर्बन टेबलटेनिस असोसिएशनच्या (टीएसटीटीए) मान्यतेने आयोजित जेव्हीपीजी-टीएसटीटीए फाईव्ह स्टार जिल्हा टेबलटेनिस स्पर्धेत रेगन अल्बुकर्क, शर्वेय सामंत, मुक्ता दळी आणि अनन्या चांदे यांनी अंतिम फेरीत धडक मारली.

 

जेव्हीपीजी येथे सुरू असलेल्या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत रीगनने विनीत दीपकचा ११-७, ११-७, ११-६, ११-६ असा पराभव केला. शर्वेय सामंतने युवराज यादववर ५-११, ११-६, ११-३, १४-१२, ११-६ अशी रोमांचक विजय मिळवला.

 

महिला एकेरीत, मुक्ताविरुद्ध संपदा भिवंडकरने दुखापतीमुळे पहिल्या गेमनंतर माघार घेतली. त्या वेळी मुक्ता १-० (११-५) अशी आघाडीवर होती. दुसऱ्या लढतीत अनन्याने सिया हिंगोराण्यावर ११-८, ११-६, ११-८, ११-७ अशी मात केली.

 

निकाल (उपांत्य फेरी):

17 वर्षांखालील मुली:
मायरा सांगलेकर विजयी वि. वैष्णवी जैस्वाल 11-7, 11-2, 11-1
निवा चौघुले विजयी वि. उर्वी चुरी 11-6, 8-11, 11-9, 11-13, 11-8

17 वर्षांखालील मुले:
अक्षांश साहू विजयी वि. झैन शेख 11-5, 13-11, 11-7
ध्रुव शहा विजयी वि. अर्णव क्षीरसागर 11-8, 10-12, 6-11, 13-11, 12-10

19 वर्षांखालील मुली:
अनन्या चांदे विजयी वि. श्रावणी लोके 6-11, 11-13, 11-4, 13-11, 11-8
उर्वी चुरी विजयी वि. मुक्ता दळीवी 7-11, 11-5, 11-5, 11-7

19 वर्षांखालील मुले:
ध्रुव शहा विजयी वि. आयुष सोनवणे 8-11, 11-7, 11-8, 11-2
शर्वेय सामंत विजयी वि. विनीत दीपक 11-9, 18-16, 8-11, 11-13, 11-8

पुरुष:
रेगन अल्बुकर्क विजयी – विनीत दीपक 11-7, 11-7, 11-6, 11-6
शर्वेय सामंत विजयी – युवराज यादव 5-11, 11-6, 11-3, 14-12, 11-6

महिला:
मुक्ता दळी विजयी वि. संपदा भिवंडकर 11-5 (दुखापतीमुळे माघार)
अनन्या चांदे विजयी वि. सिया हिंगोराण्या 11-8, 11-6, 11-8, 11-7

Post a Comment

0 Comments