प्रदीप मयेकरांची सलग सहाव्यांदा कॅरम संघटनेवर
बिनविरोध निवड
मानद सरचिटणीसपदी पुन्हा एकदा अरुण केदार
मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक दादर येथील
एल. जे. ट्रेनिंग सेंटर येथे नुकतीच पार पडली. या निवडणुकीत श्री प्रदीप मयेकर
यांची अध्यक्ष म्हणून तर श्री अरुण केदार यांची मानद सरचिटणीस म्हणून बिनविरोध
निवड करण्यात आली. एकंदरच बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत श्री प्रदीप मयेकर हे
सलग सहा वेळा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत. मानद सरचिटणीस पदावर श्री
अरुण केदार, तर मानद खजिनदार पदावर श्री संजय देसाई यांची
फेरनियुक्ती करण्यात आली आहे.
२०२४ ते २०२७ या तीन वर्षांसाठी बिनविरोध झालेल्या या
निवडणुकीत निवडून आलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे.
अध्यक्ष - श्री प्रदीप अनंत
मयेकर, कार्याध्यक्ष - श्री धनंजय नामदेव पवार,
उपाध्यक्ष - श्री केतन शशिकांत चिखले, श्री यतिन गणपत ठाकूर, मानद सरचिटणीस - श्री अरुण रमाकांत केदार, मानद सहचिटणीस - श्री अमोल
चंद्रकांत शिंदे, श्री संदेश भास्कर कांबळे, श्री संजय गोविंद बर्वे, मानद खजिनदार - श्री संजय जीवजी देसाई, कार्यकारिणी सदस्य सौ. अनुपमा अरुण केदार, श्री दिलीप राऊ सांडगे, श्री परविंदर सिंग मेहर सिंग ग्रोवर, श्री
राजेश बलिराम राणे, श्री नितीन वसंत पारकर, श्री सचिन खुशवदन घटकांबळे, श्री संजय जयवंत
मोहिते, सौ योगिता हितेन चिपळूणकर
Post a Comment
0 Comments