मुंबई स्पोर्ट्सचा पुरस्कार वितरण सोहळा २८ नोव्हेंबरला
पुरस्कार विजेत्याला मिळणार रु. एक लाख व सन्मान चिन्ह
मुंबई, मुंबई स्पोर्ट्स ज्यामध्ये विविध क्रीडा क्षेत्रातील
व्यक्ती क्रीडा क्षेत्राला उभारी देण्यासठी झटत आहेत. ज्यांचे ध्येय मुंबईतील पायाभूत
क्रीडा सुविधा सुधारण्याचे आणि मुंबई शहरातील क्रीडाप्रकार जिवंत ठेवण्याचे एकमेव
उद्दिष्ट आहे. अश्या या संस्थेने गेल्या
वर्षीपासून क्रीडा क्षेत्रातील उभरत्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी
पुरस्काराला प्रारंभ केला. पहिल्याच ‘स्पोर्ट्सपर्सन्स ऑफ द ईयर’ पुरस्कार
दिया चितळे (टेबल टेनिस), चिराग शेट्टी (बॅडमिंटन) यांना प्रत्येकी रु. एका लाख व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. तर अपेक्षा
फर्नांडिस (स्विमिंग), निशिका काळे (रिदमिक जिमनॅस्टिक), इशप्रीत सिंग चड्ढा (स्नूकर)
व निखिल दुबे (बॉक्सिंग) या खेळाडूंचा सुध्दा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या वर्षी म्हणजे २०२३-२४ च्या ‘स्पोर्ट्सपर्सन्स ऑफ द
ईयर’ पुरस्कारासाठी नामांकन करण्यासाठी ९ नोव्हे. पर्यंत अर्ज करण्याचे आव्हान
मुंबई स्पोर्ट्स तर्फे करण्यात आले आहे. या पुरस्कार निवड समितीत मुंबईचे प्रमुख
खेळाडू, क्रीडा विभाग, मुंबई स्पोर्ट्स जर्नलिस्ट असोसिएशन आणि मुंबई मराठी क्रीडा पत्रकार संघाचे एक
प्रतिनिधी यांचा समावेश आहे. त्यामुळे आलेल्या अर्जातून एम. सोमैया यांच्या अध्यक्षतेखालील
पुरस्कार छाननी समितीतील जया शेट्टी, प्रदीप गंधे, उदय देशपांडे, दत्तू फडतरे, संजय घारपुरे आणि संदीप कदम अंतिम नावे निश्चित करतील. निवड
झालेल्या खेळाडूंना २८ नोव्हेंबरला सायंकाळी बंट संघ कुर्ला येथे पुरस्कार प्रदान
केले जातील.
या पुरस्कारासाठी मुंबईतील स्थायी रहिवाशी असलेला खेळाडू जो
राज्य,
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त
खेळामध्ये प्राविण्य मिळवले आहे असा कोणताही खेळाडू अर्ज करू शकतो. त्यासाठी क्रीडापटू
स्वतः अथवा संघटना किंवा फेडरेशन क्रीडापटूंना अर्ज / नामांकित करू शकतात. अधिक
माहितीसाठी ९८२१० ९६४०० या क्रमांकावर क्षितीज वेदक यांच्याशी संपर्क करू शकता
अथवा mumbaisports2021@gmail.com ई मेल वर संपर्क करून अर्ज भरू शकता.
या पुरस्कार विजेत्या खेळाडूंना क्रीडा महर्षी मधुकर तळवलकर
यांच्याकडून पाच वर्षे रु. एक लाख दिले जाणार आहेत तर गेल्या वर्षी संजय शेटे व जय
कवळी यांच्याकडून प्रत्येकी रु. पन्नास हजार पुरस्कारासाठी दिले होते. त्याचबरोबर मुंबईच्या
शेरदिल बंट्स महासंघा द्वारे सभागृह व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.
मुंबई स्पोर्ट्स मध्ये अध्यक्ष - अदिल सुमारिवाला, संयोजक -
जय कवळी, सदस्य - जया शेट्टी,
प्रदीप गंधे, उदय देशपांडे, सुदर्शन नायर, संजय शेटे, भास्कर सावंत, अरविंद प्रभू आणि नामदेव शिरगावकर आदी क्रीडा कार्यकर्ते
काम करतात.
Post a Comment
0 Comments