सरस्वती मंदिर हायस्कूलसच्या अमृत मोहत्सवी वर्षानिमित्त आंतरशालेय
लंगडी स्पर्धा
श्री गणेश विद्यालयाचा डबल धमाका
श्री गणेश विद्यालयाची
पोर हुशार
श्री गणेश विद्यालयाचे मनस्वी भूनेसर व मानस पोस्टरे
स्पर्धेत सर्वोत्कृष्ट
मुबई, सरस्वती
मंदिर हायस्कूलसच्या अमृत मोहत्सवी वर्षानिमित्त आंतरशालेय लंगडी व खो-खो
स्पर्धांचे आयोजन केले आहे माहीमच्या सरस्वती मंदिर हायस्कूल, सेनापती बापट मार्ग येथे आयोजित आंतरशालेय लंगडी स्पर्धा मोठ्या उत्साहात
पार पडली. या स्पर्धेत अनेक शाळांनी सहभाग घेतला, आणि अंतिम
फेरीत मुलींच्या तसेच मुलांच्या गटात चुरशीचे सामने पाहायला मिळाले.
मुलींची अंतिम फेरी:
श्री गणेश विद्यालय, वडाळा यांनी सरस्वती मंदिर हायस्कूलचा २८-२२ असा एक डाव व ६ गुणांनी पराभव
केला. सरस्वतीच्या वैदवी बटावले हिने ९ गडी बाद करत उत्कृष्ट आक्रमक खेळाडूचा
किताब पटकावला. श्री गणेश विद्यालयाच्या श्रुती मोरे हिने दोन्ही डावांत प्रत्येकी
१:०० मिनिटे संरक्षण करून उत्कृष्ट संरक्षक पुरस्कार जिंकला. तसेच मनस्वी भूनेसर
हिने ४ गडी बाद करत आणि १:०० मिनिटे संरक्षण करून स्पर्धेची अष्टपैलू खेळाडू
होण्याचा बहुमान मिळवला.
मुलांची अंतिम फेरी:
श्री गणेश विद्यालय, वडाळा यांनी सरस्वती मंदिर हायस्कूलचा पाच मिनिटे राखून ३५-३४ असा एका
गुणाने रोमांचक विजय मिळवला. सरस्वतीच्या शिवम झा याने ३ गडी बाद करत उत्कृष्ट
आक्रमक खेळाडूचा पुरस्कार पटकावला. श्री गणेश विद्यालयाच्या अमेय मोहिते याने १.४०
मिनिटे व संरक्षण करून उत्कृष्ट संरक्षक पुरस्कार मिळवला, तर
मानस पोस्टरे याने ५ गडी बाद करत आणि उत्कृष्ट संरक्षणाचे योगदान देत स्पर्धेतील
अष्टपैलू खेळाडू होण्याचा मान मिळवला.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ अध्यक्ष केशव कोटणीस, डॉ. आशिष मुळगावकर, बाळ
तोरसकर, दौलतराव भोसले मुख्याध्यापक मारुती चाबुकस्वार,
उपमुख्याध्यापिका सौ. शामल बिनसाळे,
कृष्णात जाधव यांच्या हस्ते पार पडला. यावेळी भूषण मर्दे, सुधाकर राऊळ,
महेश करमळकर, संकेत डायमा आदी संस्थेकडून उपस्थित होते. आयोजकांच्या अथक परिश्रमांमुळे ही स्पर्धा यशस्वी पार पडली.
Post a Comment
0 Comments