Type Here to Get Search Results !

राज्य सब-ज्युनियर तायक्वांदो स्पर्धेत एस.डब्ल्यू.जे. अकादमीच्या खेळाडूंचे यश

 


राज्य सब-ज्युनियर तायक्वांदो स्पर्धेत 

एस.डब्ल्यू.जे. अकादमीच्या खेळाडूंचे यश

 

मुंबई: महाराष्ट्र राज्य सब-ज्युनियर तायक्वांदो स्पर्धेत एस.डब्ल्यू.जे. अकादमीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत चार सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्यपदकांची कमाई केली. ही स्पर्धा जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशन आणि तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव येथे आयोजित करण्यात आली होती.

 

एस.डब्ल्यू.जे. अकादमीच्या दुर्वा गुरव, अंतरा कश्यप, श्रिया पाडवे आणि रुद्र जाधव यांनी सुवर्णपदके जिंकली. स्पृहा जानकरने रौप्यपदक मिळवले, तर जान्हवी पांगा, समर्थ घोमन आणि स्वराज तोरसकर यांनी कांस्यपदक पटकावले. या यशामुळे सुवर्णपदक विजेते खेळाडू हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील.

 

याशिवाय, मुलींच्या गटात दुर्वा संतोष गुरवने आपली चमक दाखवत "बेस्ट फायटर"चा किताब जिंकला. सर्व खेळाडू संतोष वाळुंज, राज चकोर, असद वली, आणि समीर लवंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई सेंट्रल येथे नियमित सराव करतात.पदक विजेत्या खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष दीपक शेडे, संजय जेधे, आणि त्रुतुराज तावडे यांनी विशेष अभिनंदन केले.




 


Post a Comment

0 Comments