Type Here to Get Search Results !

एलआयसी-आयडियल कप शतक महोत्सवी बुध्दिबळ स्पर्धा १० नोव्हेंबरला

 


एलआयसी-आयडियल कप शतक महोत्सवी बुध्दिबळ स्पर्धा १० नोव्हेंबरला


मुंबई. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुपतर्फे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत  शंभराव्या बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन १० नोव्हेंबर रोजी परेल येथील आरएमएमएस वातानुकुलीन सभागृहात करण्यात येणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे बालदिनानिमित्त ७/८/९/१०/११/१२/१३/१४ वर्षाखालील मुलामुलींच्या एकूण आठ वयोगटाची एलआयसी-आयडियल कप शतक महोत्सवी बुध्दिबळ स्पर्धा स्विस लीग पध्दतीने रंगणार आहे.


    आरएमएमएस, मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना व को-ऑपरेटिव्ह एम्प्लॉईज युनियन-मुंबई सहकार्याने होणाऱ्या स्पर्धेतील विजेत्या-उपविजेत्यांना एकूण १२० पुरस्कार दिले जाणार आहेत. संयोजकांतर्फे बुध्दिबळपट, घड्याळ आदी साहित्य पुरविण्यात येणार आहेत. प्रत्येक साखळी फेरी १५-१५ मिनिटे अधिक ३ सेकंद इन्क्रिमेंटची राहील.  स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी संयोजक लीलाधर चव्हाण अथवा मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी (व्हॉटस अॅप क्रमांक ९३२४७ १९२९९) यांच्याकडे ९ नोव्हेंबर पर्यंत स़ंर्पक साधावा. .

Post a Comment

0 Comments