महर्षी दयानंद महाविद्यालयातर्फे कबड्डी व खो-खो स्पर्धेची
घोषणा
मुंबई: महर्षी दयानंद महाविद्यालय, मुंबई यांनी दरवर्षीप्रमाणे याही
वर्षी ज्येष्ठ व कनिष्ठ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन कबड्डी व खो-खो स्पर्धांचे
आयोजन केले आहे. या स्पर्धेत विद्यार्थ्यांना त्यांच्या क्रीडा कौशल्य गुणांना वाव
देण्याची एक उत्तम संधी आहे, अशा
स्पर्धांमुळे खेळाडूंना / स्पर्धकांना टीमवर्क, जलद
निर्णय घेणे, आणि शारीरिक तंदुरुस्ती यांचा उत्तम मेळ साधता येतो. महर्षी
दयानंद महाविद्यालयातील या स्पर्धेची लोकप्रियता दरवर्षी वाढतच असून यामध्ये
मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी सहभागी होतात.
स्पर्धेचा कालावधी
कबड्डी आणि खो-खो या दोन लोकप्रिय खेळांच्या स्पर्धा २ ते ५ डिसेंबर २०२४ या
कालावधीत होणार आहेत. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी आवश्यक
असलेल्या प्रवेशिकांची प्रक्रिया क्रीडा विभागातून पूर्ण करणे आवश्यक आहे.
प्रवेशिका आणि नोंदणी प्रक्रिया
इच्छुक महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांची प्रवेशिका महाविद्यालयाच्या
क्रीडा विभागातून घेणे आवश्यक आहे. त्या प्रवेशिकांवर संबंधित महाविद्यालयाचे
प्राचार्यांची स्वाक्षरी व शिक्का असणे आवश्यक आहे. प्रवेशिका दिनांक २५ नोव्हेंबर
२०२४ पर्यंत, सायं ५:०० वाजेपर्यंत श्री. मनोज पाटीलसर किंवा सौ. निकिता
लाड (क्रीडा विभाग) यांच्याकडे सुपूर्द करणे आवश्यक आहे.,
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळेवर नोंदणी करणे आवश्यक आहे, जेणेकरून
स्पर्धेच्या आयोजनात कुठलेही अडथळे येणार नाहीत.
नोंदणी अंतिम तारीख: २५ नोव्हेंबर
२०२४, सायं
५:०० वाजेपर्यंत
स्पर्धा तारीख: २ ते ५ डिसेंबर
२०२४
Post a Comment
0 Comments