Type Here to Get Search Results !

ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या पंचवार्षिक निवडणुक 'धर्मवीर कबड्डी विकास' पॅनलचा दणदणीत विजय

 


ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या पंचवार्षिक निवडणुक

'धर्मवीर कबड्डी विकास' पॅनलचा दणदणीत विजय

 

मुंबई:- ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या पंचवार्षिक निवडणुकीत कृष्णा पाटील, मनोज पाटील, भरत पाटील, मालोजी भोसले यांच्या "धर्मवीर कबड्डी विकास" पॅनलचे सर्व उमेदवार बहुमताने विजयी झाले. ठाण्याच्या श्री मावळी मंडळाच्या सभागृहात दिनांक १० नोव्हेंबर रोजी सकाळी ८:०० ते २:३० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली, आणि त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी करण्यात आली.


यापूर्वीच त्यांच्या पॅनलचे कृष्णा पाटील (अध्यक्ष, ठाणे), भरत पाटील (कार्याध्यक्ष, काल्हेर), समीर खेडेकर (कोषाध्यक्ष, ठाणे), भगीरथ पाटील (सहचिटणीस, वळ, भिवंडी), विशाल गलुगडे (सहचिटणीस, कोपरखैरणे), मंदार तावडे (सहचिटणीस, बदलापूर), मोरेश्वर पवार (सहचिटणीस, ठाणे) यांची बिनविरोध निवड झाली होती.


आजच्या निवडणुकीत सरचिटणीस, सहकोषाध्यक्ष, आणि १० सदस्यीय पदा करीता मतदान घेण्यात आले.


सरचिटणीस पदासाठी:

मालोजी भोसले (ठाणे) आणि सचिन पाटील (ठाणे) यांच्या दरम्यान थेट लढत झाली. यात मालोजी भोसले यांना ४०६ मते मिळाली, तर सचिन पाटील यांना १५४ मते मिळाली. मालोजी भोसले यांनी २५२ मतांनी विजय मिळविला.


सहकोषाध्यक्ष पदासाठी:

बाळू उबाळे (कल्याण) आणि देवानंद पाटील (दापोडे, भिवंडी) यांच्यात लढत होती. बाळू उबाळे यांना ४२६ मते मिळाली, तर देवानंद पाटील यांना ९९ मते मिळाली. बाळू उबाळे यांचा ३२७ मतांनी विजय झाला.


सदस्य पदासाठी निवडून आलेले उमेदवार:
१. भूषण पाटील (काल्हेर, भिवंडी) – ५२६ मते
२. सुधाकर चौघुले (वडूनवघर, भिवंडी) – ५१६ मते
३. प्रवीण दळवी (ठाणे) – ५१९ मते
४. जगदीश धुमाळ (टिटवाळा) – ५२२ मते
५. सुरेश लांघी (कल्याण) – ४८७ मते
६. रोशन म्हात्रे (कालवार) – ५२२ मते
७. मिलिंद पाटील (डोंबिवली) – ५२० मते
८. संदीप शिकारे (कोपरखैरणे, नवी मुंबई) – ५१५ मते
९. दशरथ शिंदे (ठाणे) – ५१० मते
१०. सुरेश तरे (बदलापूर) – ५१७ मते

तर धनराज पाटील (कल्याण)५८ मते, आणि मनोज चव्हाण (रबाळे)४३ मते मिळवून पराभूत झाले.


निवडणूक अधिकारी म्हणून निवृत्त न्यायाधीश दिलीप जोशी यांनी, तसेच त्यांचे सहाय्यक म्हणून मिनानाथ धानजी आणि सदानंद माजलकर यांनी काम पाहिले.


Post a Comment

0 Comments