Type Here to Get Search Results !

बॉम्बे जिमखाना क्रिकेट निवडचाचणी २१ आणि २२ नोव्हेंबरला

 



बॉम्बे जिमखाना क्रिकेट निवडचाचणी २१ आणि २२ नोव्हेंबरला

 

मुंबई, १८ नोव्हेंबर: बॉम्बे जिमखान्याच्या बीजी केअर्स (BG Cares) या सीएसआर उपक्रमांतर्गत जिमखाना मैदानावर २१ आणि २२ नोव्हेंबर २०२४ रोजी १९ आणि २३ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट निवडचाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.

 

निवडचाचणी दोन वयोगटांत होईल: १९ वर्षांखालील (01.09.2005 रोजी किंवा नंतर जन्मलेले) आणि २३ वर्षांखालील (01.09.2001 ते 31.08.2005 दरम्यान जन्मलेले) खेळाडूंकरिता. प्रत्येक वयोगटातून २० खेळाडूंची निवड केली जाणार आहे.

 

इच्छुकांनी चाचणीसाठी २१ आणि २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता बॉम्बे जिमखाना मैदानावर पांढरा क्रिकेट गणवेश आणि शूज घालून उपस्थित राहावे. त्यांच्याकडे जन्म दाखला आणि आधार कार्डची प्रत असणे आवश्यक आहे.

 

निवडलेल्या खेळाडूंना बॉम्बे जिमखान्याच्या तर्फे १९ आणि २३ वर्षांखालील मुलांसाठी मोफत वार्षिक क्रिकेट प्रशिक्षण शिबिर आयोजित केले जाईल. हे शिबिर अंबा श्री फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित केले जात आहे.

 

प्रशिक्षण शिबिर २६ नोव्हेंबर २०२४ ते ३१ मे २०२५ या कालावधीत होईल. शिबिराच्या दरम्यान, सहभागी खेळाडूंना अनुभवी प्रशिक्षक फरहाद दारूवाला यांचे मार्गदर्शन मिळेल. दारूवाला हे जागतिक क्रिकेट अकॅडमी आणि झुबिन भरुचा यांच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल चाचणी शिबिरांचे माजी सहाय्यक प्रशिक्षक आहेत आणि त्यांनी २०१९ मध्ये कॅनडा राष्ट्रीय संघासाठी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम केले आहे.

 

हे प्रशिक्षण शिबिर मंगळवार ते शुक्रवार सकाळी १० ते २ या वेळेत होईल.


Post a Comment

0 Comments