Type Here to Get Search Results !

एमसीए महिला लीग 2024-25 फोर्ट यंगस्टर्सच्या विजयात अष्टपैलू जान्हवी काटे चमकली

 



एमसीए महिला लीग 2024-25

फोर्ट यंगस्टर्सच्या विजयात अष्टपैलू जान्हवी काटे चमकली

 

मुंबई, 7 नोव्हेंबर: महिला लीग 2024-25 स्पर्धेतील रोमांचक लढतीत फोर्ट यंगस्टर्सने ग्लोरियस सीसीवर 125 धावांनी मात केली.

यशवंत नगर मैदान, विरार येथे गुरुवारी खेळल्या गेलेल्या या सामन्यात फोर्ट यंगस्टर्सने प्रथम फलंदाजी करत 40 षटकांत 8 बाद 266 धावा केल्या. अष्टपैलू खेळाडू जान्हवी काटेने 105 चेंडूत 17 चौकारांसह नाबाद 134 धावा करत संघाच्या धावसंख्येत मोलाचा वाटा उचलला व संघाला अडीचशेचा टप्पा ओलांडून दिला. तील हिया पंडितने (57) चांगली साथ दिली.

ग्लोरियस सीसीला मोठे आव्हान पेलवले नाही आणि त्यांचा डाव 34.1 षटकांत 141 धावांत आटोपला. जान्हवी काटेने सामन्यात 19 धावत 4 विकेट घेत प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखले. हिया पंडितने देखील 2 विकेट घेत तिच्या गोलंदाजीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.

अन्य लढतीतजैनी शहाने110 धावांची नाबाद खेळी करताना महाराष्ट्र यंग क्रिकेटर्सच्या जेभाटिया एससीविरुद्धच्या मोठ्या विजयाला हातभार लावलातिने 122 चेंडूमध्ये 9 चौकार आणि 2 षटकारांसह शतकी खेळी साकारलीसाईनाथ एससीच्या डॅशिंग एससीविरुद्धच्या विजयात पर्ल कोरिया (19 धावात 6 विकेटचमकली.

 

सामन्यांचे संक्षिप्त धावफलक:

साईनाथ एससी 147 (39.1 षटकांत), (निधी घरत 49, श्रीनी सोनी 30; पूर्ती नाईक 4/23), वि. डॅशिंग एससी 70 (23.5 षटकांत), (पर्ल कोरिया 6/21, वेदिका पाटील 2/10), निकाल: साईनाथ एससी 77 धावांनी विजयी.

 

भारतीय डायनामाइट सीसी 157 (38 षटकांत), (तन्वी परब 29, विधी उदेशी 27; अवनी खंडागळे 3/18, वैष्णवी पालव 3/37), वि. भिवंडी तालुका सीए 158/6 (32.3 षटकांत), निकाल: भिवंडी तालुका सीए 4 विकेट राखून विजयी.

 

विजय सीसी 150 (32.1 षटकांत), (महेक पोकर 51, मानसी तिवारी 29; मंजिरी गावडे 5/19, अदिती सुर्वे 3/31), वि. दिलीप वेंगसरकर फाउंडेशन 152/1 (सामंत 69*, सानिका चाळके 72*), निकाल: दिलीप वेंगसरकर फाउंडेशन 9 विकेट राखून विजयी.

 

महाराष्ट्र यंग क्रिकेटर्स 221/5 (40 षटकांत), (जैनी शहा 110* (122 चेंडू, 9 चौकार, 2 षटकार)), वि. जे. भाटिया एससी 74 (29.2 षटकांत), (रिद्धी गोस्वामी 4/22), निकाल: महाराष्ट्र यंग क्रिकेटर्स 147 धावांनी विजयी.

 

फोर्ट यंगस्टर्स 266/8 (40 षटकांत), (जान्हवी काटे 134* (105 चेंडू, 17 चौकार), हीया पंडित 57), वि. ग्लोरियस सीसी 141 (34.1 षटकांत), (साध्वी संजय 43, श्रद्धा शेट्टी 27*; जान्हवी काटे 4/19, हिया पंडित 2/32), निकाल: फोर्ट यंगस्टर्स 125 धावांनी विजयी.

 

फोटो – जान्हवी काटे: फोर्ट यंगस्टर्सची अष्टपैलू खेळाडू जान्हवी काटेने नाबाद 134 धावा केल्या आणि 19 धावांत 4 बळी घेतले.

 

छायाचित्र – खुश ठक्कर: डॉ. डी.वाय. पाटील सलामीवीर खुशी ठक्करने नाबाद 134 धावा केल्या.

 

फोटो – पर्ल: साईनाथ एससी मध्यमगती गोलंदाज पर्ल कोरेरा याने २१ धावांत सहा गडी बाद केले.




Post a Comment

0 Comments