सिनियर वुमेन्स टी-20 ट्रॉफी
मुंबईने बंगालचा खुर्दा उडवत वुमेन्स टी-20 चॅम्पियनशिप घातली खिशात
अजिंक्य नाईक यांनी विजेत्या संघाला ४० लाखाचे अतिरिक्त
बक्षीस जाहीर केले
मुंबई, १२ नोव्हेंबर:
मुंबईने आज झालेल्या सिनियर वुमेन्स टी-20 ट्रॉफीच्या अंतिम
सामन्यात बंगालचा १० गडी राखून पराभव करताना चॅम्पियन बनले. वानखेडे स्टेडियम,
चर्चगेटवर झालेल्या या सामन्यात मुंबईच्या महिला क्रिकेट संघाने
अत्यंत प्रभावी खेळी केली.
बंगालने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८५ धावांमध्ये सर्व संघ बाद झाला.
बंगालच्या धारा गुज्जर (२६ धावा) आणि हिरीशिता बासू (१८ धावा) या दोन फलंदाजांनी
कडवी लढत दिली. मुंबईच्या गोलंदाजीचा मुख्य आकर्षण ठरलेली जैग्रवी पवार (३/१३) आणि
सौम्या सिंग (२/११) यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि बंगालच्या संघाला मोठी
धावसंख्या उभारण्याची संधी दिली नाही.
उत्तरार्धात मुंबईच्या, सलामीच्या
जोडीने वृषाली भगत आणि हुमा इरा काझी यांनी अप्रतिम फलंदाजी केली. वृषाली भगत ३९
चेंडूंमध्ये नाबाद ४५ धावा करत मुंबईला विजयाच्या दिशेने नेले, तर हुमा इरा काझीने ३६ चेंडूंमध्ये नाबाद ४१ धावा केल्या. मुंबईने १२.३
षटकांत ८६ धावांचा लक्ष्य सहजतेने पार करत विजय मिळवला.
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी मुंबई संघाच्या उत्कृष्ट
कामगिरीचे कौतुक केले आणि विजेत्या संघाला अतिरिक्त ४० लाख रुपयांची रोख रक्कम
जाहीर केली. "मुंबई महिला क्रिकेट संघाच्या या अद्वितीय विजयाबद्दल अभिनंदन!
तुमच्या कठोर परिश्रमाने मिळवलेल्या विजयाचा आम्हाला अभिमान वाटतो. या विजयानंतर
तुमच्यावर असलेला विश्वास युवा महिला क्रिकेटपटूंना प्रेरित करेल," असे अजिंक्य नाईक यांनी सांगितले.
संपूर्ण सामन्याचे निकाल:
- बंगाल: ८५ धावांवर सर्वबाद, २० षटकांत (धारा गुज्जर २६, हिरीशिता बासू १८; जैग्रवी पवार ३/१३, सौम्या सिंग २/११)
- मुंबई: ८६/०, १२.३ षटकांत (वृषाली भगत ४५* (३९ चेंडू), हुमा इरा काझी ४१* (३६ चेंडू))
तसेच, सामन्याच्या पारितोषिक वितरण समारंभात हुमा
इरा काझी यांनी सिनियर वुमेन्स टी-20 ट्रॉफी मुंबई क्रिकेट
असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्या हस्ते स्वीकारली.
Post a Comment
0 Comments