संत ज्ञानेश्वर चषक कॅरम स्पर्धेत सार्थक, निल, देविका, पुष्करची विजयी सलामी
मुंबई ज्ञानेश्वर विद्यालय-वडाळा, आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व सुमती सेवा मंडळतर्फे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सुरु झालेल्या संत ज्ञानेश्वर चषक आंतर शालेय कॅरम स्पर्धेत सार्थक केरकर, निल म्हात्रे, देविका जोशी, पुष्कर गोळे, अमेय जंगम आदींनी सलामीचे सामने जिंकले. पार्ले टिळक विद्यालयाच्या सार्थक केरकरने तरुण यादवचे आव्हान २१-५ असे सहज संपुष्टात आणतांना उत्तम फटकेबाज खेळ केला. स्पर्धेचे उदघाटन ज्ञानेश्वर विद्यालयाचे अध्यक्ष धैर्यशील जाधव, खजिनदार भास्कर सावंत, मुख्याध्यापक महेंद्र पाटील, सुमती सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद पार्टे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
संत ज्ञानेश्वर चषक आंतर शालेय कॅरम स्पर्धेची दुसरी फेरी गाठताना डोंबिवलीच्या पाटकर विद्यालयाच्या निल म्हात्रेने मोहमद फारुकीला निल गेम दिला. देविका जोशीने सरळ जाणाऱ्या सोंगट्यांचे सातत्य राखत तन्वी कांबळेवर असा विजय मिळविला. अन्य सामन्यात पुष्कर गोळेने केतकी मुंडलेचा , अमेय जंगमने आर्य बनसोडेचा २१-६, सैफ शेखने गणेश उपाध्यायचा , हर्ष मोहितेने साहिल वाघेलाचा तर ओवाईस पठाणने आयुष कांदळगावकरचा पराभव करून पहिली फेरी जिंकली. स्पर्धेमध्ये मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी आदी जिल्ह्यांतील ६५ शालेय खेळाडूंनी भाग घेतला असून वडाळा येथील ज्ञानेश्वर विद्यालय सभागृहात रंगतदार खेळ करीत आहेत.
Post a Comment
0 Comments