Type Here to Get Search Results !

राज्य खो खो पंच शिबिर वसमतला, २७ व २८ जुलैला – सुधाकर राऊळ, पंच मंडळ अध्यक्ष

 


राज्य खो खो पंच शिबिर वसमतला, २७ व २८ जुलैला – 

सुधाकर राऊळ, पंच मंडळ अध्यक्ष

मुंबई,दि. १७ जुलै, (क्री. प्र.),महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे २०२४-२५ या वर्षीचे राज्य खो खो पंच शिबीर दि २७ व २८ जुलै रोजी हिंगोली जिल्हा ॲम्युचर खो खो असोसिएशन यांच्या संयोजनाखाली मयूर मंगल कार्यालय,  ्य खो खो पंच शिबिर  पूर्णा सहकारी कारखाना रोड,वसमत (जि. हिंगोली) येथे आयोजित केले आहे. या शिबिरात नवीन नियमांवर चर्चा केली जाणार आहे. तसेच या शिबिरात प्रात्यक्षिक सुध्दा घेतले जाणार आहे असे महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे पंच मंडळ अध्यक्ष सुधाकर राऊळ यांनी सांगितले.  


तसेच या पंच शिबिरामध्ये पूर्णवेळ उपस्थित असलेल्या पंचांनाच राज्य स्पर्धांकरिता नियुक्ती देण्यात येणार आहे. संलग्न जिल्ह्यातील राज्य/राष्ट्रीय पंच परीक्षा उत्तीर्ण पंचानी ऑनलाईन नोंदणी २० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत https://forms.gle/1WYQ3Sa122yCstcg7  या लिंकवर करावी. नोंदणी केलेल्या पंचानाच शिबिरात सहभागी होता येईल असे महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे पंच मंडळ सचिव प्रशांत पाटणकर (काका) व पंच मंडळ सहसचिव नानासाहेब झांबरे यांनी कळविले आहे.     


हे शिबिर यशस्वी करण्यासाठी तांत्रिक समितीचे योगदान सुद्धा मोठे असते. यासाठी तांत्रिक समितीचे अध्यक्ष नागनाथ गजमल, समितीचे सचिव नरेंद्र कुंदर, समितीचे सहसचिव आशिष पाटील यांच्यासह सर्व पंच व पदाधिकारी हे शिबिर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत.


अधिक माहितीसाठी  नागनाथ गजमल (भ्रमणध्वनी क्र. ९४२१३८१४२०) अथवा अमोल मुटकुळे (भ्रमणध्वनी क्र. ९७६५५२५७२९) यांच्याशी संपर्क साधावा असे महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सरचिटणीस डॉ. चंद्रजीत जाधव व कार्यालयीन सचिव डॉ. प्रशांत इनामदार यांनी कळविले आहे.


Post a Comment

0 Comments