इनडोअर क्रिकेटसाठी खेळाडूंच्या
तंदुरुस्तीची कसोटी लागणार !
इनडोअर क्रिकेटमुळे भारताला प्रतिभावान खेळाडू
मिळतील !! - द्रोणाचार्य पुरस्कार विजेते दिनेश लाड
मुंबई, ८ जुलै,
(क्री. प्र.) : महाइनडोअर क्रिकेट असोसिएशन (MICA) व महामुंबई इनडोअर क्रिकेट स्पोर्ट्स असोशिएशनने (MICSA) ७ जुलै रोजी भारताकडून खेळलेल्या व उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंचा
सत्कार गरवारे क्लब, वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे संपन्न झाला. या खेळाडूंचा सत्कार
द्रोणाचार्य पुरस्कार विजेते क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांच्या हस्ते
पार पडला. इनडोअर क्रिकेटपटूंनी दाखवलेल्या समर्पण, कठोर
परिश्रम आणि खिलाडूवृत्तीचा हा सत्कार होता. यावेळी दिनेश लाड यांच्या हस्ते https://mahamumbaiindoorcricket.com/ या वेबसाईटचे सुध्दा उद्घाटन करण्यात आले.
या सत्कार समारंभाआधी द्रोणाचार्य पुरस्कार विजेते क्रिकेट प्रशिक्षक दिनेश
लाड यांचा सुध्दा सत्कार महाइनडोअर क्रिकेट असोसिएशन (MICA) व महामुंबई इनडोअर क्रिकेट
स्पोर्ट्स असोशिएशनने (MICSA) कडून दत्तात्रय वेदक (माजी
अध्यक्ष, मुंबई महिला क्रिकेट असो. व माजी व्यवस्थापाकीय सदस्य, गरवारे क्लब)
यांच्या हस्ते करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना त्यांनी इनडोअर क्रिकेट
मुळे भारताला प्रतिभावान खेळाडू मिळतील असे सांगितले. इनडोअर क्रिकेट खेळताना खेळाडूंची
चपळता व खेळाडूंची होणारी दमछाक पाहता खेळाडूंच्या
तंदुरुस्तीची कसोटी लागणार असल्याचे सुध्दा त्यांनी सांगितले. इनडोअर क्रिकेट मुळे
क्रिकेट खेळाडूंना एक वेगळे क्रिकेट खेळण्याचे क्षितीज उघडे झाल्याचेही त्यांनी
स्पष्ट केले. इनडोअर क्रिकेट वाढीसाठी व प्रचार प्रसार करण्यासाठीसुध्दा प्रत्यक्ष
काम करणार असल्याचे दिनेश लाड यांनी जाहीर केले.
“चला इनडोअर क्रिकेट खेळूया” हे घोषवाक्य देखील इनडोअर क्रिकेटला
प्रोत्साहन देण्यासाठी अधिकृत घोषणा म्हणून घोषित करण्यात आली. द्रोणाचार्य
पुरस्कार विजेते दिनेश लाड यांनी आपल्या भाषणात बँकर्स, सॉफ्टवेअर इंजिनीअर, एअरलाइन कर्मचारी, क्रिप्टो ट्रेनर यांसारख्या
व्यावसायिक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील मास्टर्स श्रेणीमध्ये भाग घेऊन
इनडोअर क्रिकेटच्या या अनोख्या फॉरमॅटमध्ये खेळण्याची आवड जोपासताना पाहून आनंद
झाला असल्याचे सांगितले.
या वर्षी जागतिक पुरुष व महिलांसाठी मास्टर्स सिरीज श्रीलंका येथे २७ सप्टेम्बर
ते ५ ऑक्टोबर या कालावधीत होणार असल्याचे सुध्दा जाहीर करण्यात आले.
जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाच्या (WICF) मान्यतेने इंडियन इनडोअर स्पोर्ट्स फाउंडेशन (IISF)
कडून महाइनडोअर क्रिकेट असोसिएशनच्या (महाराष्ट्र) जवळजवळ १५ खेळाडूंनी विविध गटातून भारताकडून प्रतिनिधित्व केले आहे.
विशेष म्हणजे प्रशांत कारीयाने नुकत्याच झालेल्या इंग्लंड-एशिया कप स्पर्धेत (४०
वर्षावरील) संघाचे भारताचे उपकर्णधार पद भूषवले होते. मुंबईच्याच जयेश साळगावकर यांनी
खुल्या गटासाठी भारताचे प्रशिक्षकपद भूषविले होते. तर प्रकाश राठोडने ४० वर्षावरील
भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषविले होते. हा महाराष्ट्रच्या महाइनडोअर क्रिकेट
असोसिएशनचा अभिमानाचा क्षण होता.
त्याचबरोबर हरहुन्नरी नरेश खुराणा, अंशुल शर्मा, गौरव कांबळी, राकेश चव्हाण, विनोद
सिंग, हरेश खत्री, समीर शहा, झुबीन हकीम, अमित घेजी व मनीष मित्तल यांनी (४० वर्षावरील) भारतीय संघाचे प्रतिनिधित्व
केले आहे. तर नचिकेत कांबळी व शुभम खोत यांनी भारताच्या डेव्हलपमेंट संघाकडून खुल्या
गटात प्रतिनिधित्व केले होते.
या कार्यक्रमात अजय नाईक, अध्यक्ष (IISF), श्री. मिलिंद पुंजा, महासचिव (IISF),
सेट्रिक जो, प्रसन्ना
कुमार, बी. व्ही. आचार्य (सीईओ, गरवारे क्लब हाऊस) वीणा
परळकर, ज्योती सातघरे, विनया तोरसकर व डी. बी. वेदक (माजी अध्यक्ष, मुंबई महिला
क्रिकेट असो.) व जय कवळी (मुष्टीयोद्धा व उपाअध्यक्ष – महाराष्ट्र ऑलिंपिक असो. ) यांचे विशेष आभार व्यक्त केले.
तसेच यावेळी विलास गोडबोले, कौशिक गोडबोले, अभय हडप, अरुंधती घोष, वृंदा भगत, वैशाली भिडे-बर्वे, ॲड. रुपाली
ठाकूर, सुष्मा मढवी, हेमंत पेडणेकर, निखील राजाध्यक्ष (सीए), नितेश पाटील, सचिन
पिळणकर आदि सन्माननीय व्यक्ती ज्यांनी इनडोअर क्रिकेट वाढवण्यासाठी मदत केली त्यांना
सुध्दा क्षितिज वेदक – संस्थापक चेअरमन, व
बाळ तोरसकर - संस्थापक सेक्रेटरी व रोहित
कुलकर्णी (सीएस) – संस्थापक संचालक यांच्याकडून सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. तर
या समारंभाचे संचलन वर्षा उपाध्याय (प्रशिक्षक, हृदमिक जिम्नॅस्टिक) यांनी केले.
Post a Comment
0 Comments