Type Here to Get Search Results !

वांगणी केंद्राच्या वंश चुंबळेची हॅट्रिक ! बोरिवली, ठाणे, विरार,वरळी,वांगणी, एमसीए अ केंद्र सुपर सिक्समध्ये दाखल.

 


वांगणी केंद्राच्या वंश चुंबळेची  हॅट्रिक !

बोरिवली, ठाणे, विरार,वरळी,वांगणी, एमसीए अ केंद्र 

सुपर सिक्समध्ये दाखल. 

मुंबई     न्यु हिंद स्पोर्टिंग क्लबतफे आयोजित करण्यात आलेल्या ३२ व्या एलआयसी कल्पेश गोंविद स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेत बोरिवली ठाणे, विरार,वरळी, वांगणी, एमसीए अ‌  केंद्राच्या संघानी सुपर सिक्समध्ये प्रवेश केला आहे. आपल्या तिसरया फेरीच्या लढतीत अ गटात एमसीए अ संघाने पालघरचा आरामात पराभव केला. विजयी संघाच्या हसन खिराडीयाने ८५ धावांची‌ सुरेख खेळी केली. धैर्य देसाईने शानदार गोलंदाजी करताना ९ बळी घेतले. ब गटात बोरिवली केंद्राने निर्णायक विजय मिळवताना गोरेगांव‌ केंद्राचा दहा गडी राखून सहज पराभव केला. .विजयी संघाच्या अर्णव लाडने ४ बळी घेतले. .ड गटात ठाण्याने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर एमसीए ब केंद्राला पराभूत केले. .विजयी संघातर्फे किणीने नाबाद शतक ठोकले. त्याला साळुंखे आणि खांडेकरने अर्ध शतकी खेळी करून छान साथ दिली. ई गटात वांगणी केंद्राने देखील पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर दिवा केंद्रावर विजय मिळवला. वांगणीच्या विजयात अष्टपैलू खेळ करणारा वंश चुंबळे चमकला.त्याने अर्ध शतकी खेळी केली. मग सुरेख मारा करताना हटिकसह चार बळी घेतले. त्याला आकाशने अर्ध शतक फटकावुन आणि रोनीलने तीन बळी घेत चांगली साथ दिली. .क गटात विरारने माटुंगा केंद्राविरुध्द निर्णायक विजय मिळवला. त्यांच्या वेदांत अनुभवणेने तीन बळी घेतले.  एफ गटात वरळीने डोंबिवली संघाचा पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर पराभव केला. .विजयी संघाच्या वर्मा, वाघधरेने अर्ध शतकी खेळी केली. आर्यन बाबरदेसाईने अष्टपैलू खेळ करीत ४३ धावा केल्या आणि ३बळी देखील घेतले.सुपर सिक्सच्या लढती २१ ,२२ मे रोजी माटुंग्याच्या मेजर दडकर मैदानात होतील..


Post a Comment

0 Comments